
स्टार ११ महाराष्ट्र – अभिजीत शिंगटे
केळघर. दि.२८. गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांचे वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श कामगार पुरस्कार २०२२चे पूरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
गेली २५ वर्ष सातत्यपूर्ण चालविलेल्या या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून दाखल झालेल्या प्रस्तावापैकी मुलाखतीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना मुलाखतीस पाचारण करणेत आले होते त्यानुसार पुढील कर्मचारी यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहेत.
श्री.अभिजीत नारायण शिंगटे,प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि.सातारा,श्री. दत्तात्रय विठ्ठल भोसले गोदरेज अँड बॉईस मॅन्यु कं लि. लॉकिम मोटर्स ग्रुप,शिंदेवाडी शिरवळ सौ. खुतेजापरवीन अशपाकअली मुल्ला, अजिंक्यतारा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा.लि. सातारा श्री.रामदास नामदेव शिंदे गरवारे टेक्नीकल फायबर्स लि. वाई श्री.राजकुमार गुलाबराव किर्दत अल्फा लावल इंडिया लि. सातारा सदरचा पुरस्कार वितरण समारंभ लवकरच . श्री.डॉ. प्रसन्न बाबर तसेच मा श्री.डॉ. शंतनु पवार संचालक अजिंक्यतारा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सातारा यांचे शुभहस्ते मा श्री. इकबाल काझी अध्यक्ष गुणवंत कामगार प्रतिष्ठान , सातारा यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
तरी या पुरस्कार वितरण समारंभास सातारकर नागरीक, बंधू, भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने सरचिटणीस श्री. महेंद्र पवार, कार्याध्यक्ष श्री. जयंत देशपांडे, उपाध्यक्ष सौ. श्रध्दा करंदीकर, खजिनदार श्री अमृत साळूंखे, जेष्ठ सल्लागार श्री रघुवीर आपटे, श्री. दिलीप चरेगावकर श्री. गोपाळ खजुरे, श्री. सुरेश साधले, श्री. अशोकराव जाधव, श्री. गजानन घाडगे, जिल्हा संघटक महेंद्र धनवे, जिल्हा समन्वयक श्री. संजय पवार, प्रसिद्धी प्रमूख श्री. राजकुमार पवार यांनी केले आहे.



