स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ

केळघर दि.१८. जावली तालुक्यातील केळघर येथे आज गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी सीसीटीवी बसविण्यात आले,या सीसीटीवीचे उद्घाटन मेढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमोल माने यांच्या हस्ते करण्यात आले.
केळघर गावचा हा उपक्रम हा अत्यंत सुंदर व लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गरजेचे आहे,अशा या उपक्रमामुळे केळघर हे बाजारपेठेचे गाव असून सातारा महाबळेश्र्वर रोडवर हे गाव असेलमुळे या रोड वरून बऱ्याच प्रमाणात वाहतूक असते, वाहतुकीस अडथळा, किंवा बाजार पेठेत होणाऱ्या अनुचित प्रकारावर या सीसीटीवीमुळे नक्कीच वचक ठेवता येईल सीसीटीव्ही कॅमेरा मुळे गुन्हेगारी कमी होत आहे आणि त्यामुळेच रिमोट द्वारे लक्ष ठेवणे सुलभ झाले आहे.असे प्रतिपादन सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी या कार्यक्रमाच्या वेळी केले. 
आज जागोजागी चोरी,दरोडे,अपहरण लुटमारीचे प्रमाण खुप अधिक प्रमाणात वाढले आहे.ह्या अनैतिक कृत्यांना जर आळा घालायचा असेल तर आपण सावधगिरीने राहणे फार गरजेचे आहे.या दृष्टीने आज केळघर गावात सीसीटीव्ही बसविल्या मुळे गावात होणारे अनुचित प्रकार होणार नाहीत. सीसीटीव्ही कॅमेरा हा आज चोरांसाठी मोठा अडथळा ठरलेला आहे कारण अनेकदा चोराला आपण सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असल्याचे समजले की तो तिथून निघण्याचा विचार करतो, सीसीटिवीच्या उद्घाटन प्रसंगी केळघर सरपंच रविंद्र सल्लक यांनी सांगितले.
सध्या दिवसमान खुप खराब आहेत आज दिवसाढवळया सुदधा घरात चोरी दरोडे होत असतात.गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही हा उत्तम पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे फुटेज पोलिसांना गुन्हेगारांच्या तपासात मोलाची मदत करते असे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या वेळी केळघर विभागाचे ज्येष्ठ नेते श्री मोहनराव कासुर्डे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या वेळी उपसरपंच संदीप बेलोशे युवा नेते अंकुश बेलोशे, उद्योजक सुधिर पार्टे उद्योजक संतोष कासुर्डे सदस्य जितेंद्र चव्हाण बिट अमलदार नितिन जाधव ग्रामसेवक शिवाजी निर्मल पोलीस पाटील विष्णू दळवी पत्रकार संजय दळवी पत्रकार रघुनाथ पार्टे पत्रकार संदीप गाडवे पत्रकार संतोष बेलोश पत्रकार युवराज धुमाळ दिलीप वायदंडे सर सागर सल्लक जितेंद्र कदम शैलेश पार्टे दिपक शिंदे आदि उपस्तिथ होते.

सावधान केळघर गावात फिरताय आपण सीसी टिवीच्या कक्षेत आहात



