शिवसेना वर्धापन दिना निमित्त मायेची सावली एक हात कर्तव्याचा ज्येष्ठ नागरिकांना छत्री व टी शर्ट वाटप

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
मुंबई. दि.२०.मायेची सावली एक हात कर्तव्याचा या गोरगरिबांसाठी सामाजिक कामे करणाऱ्या परीवाराच्या वतीने शिवसेना वर्धापन दिना निमित्त रविवार दिनांक १९/६/२०२२ रोजी सकाळी प्रि.वामनराव महाडीक उद्यान परळ येथे ज्येष्ठ नागरिकांना छत्री व टी शर्ट वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शिवसेनेच्या जुन्या आठवणी,इतिहास या बद्दल वरिष्ठ शिवसैनिकांनी आठवणी जागवल्या व मायेची सावली एक हात कर्तव्याचा ग्रुप च्या सामाजिक कार्याबद्दल माहिती देण्यात आली.
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र संपर्क समन्वयक श्री.जितेंद्र दगडू सकपाळ,ज्येष्ठ शिवसैनिक श्री.सुरेश बावकर, समाजसेविका सौ.रेश्मा सकपाळ गावकर, परिवाराचे संस्थापक श्री.यशवंत खोपकर, अध्यक्ष श्री.रविन्द्र जाधव, सेक्रेटरी श्री.प्रमोद चौडकर,सहखजिनंदार श्री.सदाशिव लाड़,श्री.विश्वनाथ जाधव, श्री.संदीप चांदीवडे,श्री.राम वैध,श्री.भरत पंडीत,श्री.बंडु चौधरी,श्री.संजय चव्हाण,AIACPC चे मुंबई सचिव श्री.हितेश गायकवाड,माथाडी कामगार सेनेचे श्री. लितेश केरकर तसेच उद्यान मित्रमंडळी श्री सुरेश जगताप,श्री.आशिष दिघे,श्री.रविंद्र मसुरकर, श्री.चंद्रकांत शिंदे, श्री.सुशील मोहिते, श्री.परशुराम सावंत, श्री.सुरेश बागवे, श्री.सकपाळ गुरूजी, श्री.शैलेंद्र गोडबोले, श्री.प्रकाश झींगाडे,सौ.प्रभा झींगाडे,सौ.सुषमा कांबळे
आणी इतर आदरणीय वरिष्ठ सदस्य उपस्थित होते.



