कासवंड ता.महाबळेश्र्वर चोरमलेवाडी व परिसर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायीवारी नाम दिंडी सोहळ्याचे आज प्रस्थान

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
केळघर .दि.२८. कासवंड ता.महाबळेश्र्वर चोरमलेवाडी व परिसर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायीवारी नाम दिंडी सोहळ्याचे आज चोरमलेवाडी येथून प्रस्थान झाले.या प्रस्थानास राजेंद्र शेठ राजपुरे संचालक सातारा बँक.नितीन दादा.भिलारे राजेंद्र.राजू आबा भिलारे.विजय भिलारे.किसन शेठ भिलारे.मयूर होरा मॅप्रो गार्डन. ग्रामपंचायत सरपंच जनार्दन चोरमले.ह.भ.प दत्तात्रय महाराज गाढवे सातारा इतर मान्यवरांनी नारळ फोडून पायीवारी दिंडीला आणि वारकऱ्यांना पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या.
भिलार भोसे पाचगणी गणेश पेठ काटवली बेलोशी या गावांमध्ये पाय हरिनाम दिंडीचे व वारकऱ्यांचे गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले भिलार व पाचगणी येथे रिंगण करण्यात आले तसेच आजचा प्रथम दिवसाचा मुक्काम दापोडी येथे होणार आहे दापोडी येथील गावकऱ्यांनी दिंडीचे वारकऱ्यांचे स्वागत करून जेवणाची व मुक्कामाची सोय केली आहे.
प्रथम दिवसाचे कीर्तन ह.भ.प जनार्दन महाराज चोरमले यांचे कीर्तन करण्यात आले तसेच पुढील प्रवास शेते सातारा कोरेगाव गोंदवले मार्गे पंढरपूर एकादशी पर्यंत पोहोचणार आहे.



