कृषीसातारासामाजिक

आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून केळघर विभागातील अतिृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची दुरुस्ती

केळघर, दि.०७ जावली तालुक्यातील केळघर विभागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले असून आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून नाम फाऊंडेशन च्या सहकार्यातून केळघर विभागातील अतिृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक श्री.ज्ञानदेव रांजणे यांनी दिली.

गतवर्षी २२व २३जुलै ला झालेल्या अतिवृष्टीमुळे जावळी तालुक्यातील ७४ गावांतील १८७८ शेतकऱ्यांच्या २५३.०६ हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले होते. विशेषत केळघर विभागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या कालावधीत प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्याने नदीकाठच्या संपूर्ण शेतजमीनी उद्धवस्त झाल्या आहेत त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.या शेतीची दुरुस्ती करण्यासाठी नाम फाऊंडेशन ची मदत घेणार असून दुरुस्ती साठी लागणारी मशिनरी व इंधन ही उपलब्ध करून देणार असून नुकसानीत शेतीची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरच काम सुरू होणार आहे.
केळघर विभागातील शेतकऱ्यांना आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले यांच्या मुळे मोठा दिलासा मिळणार असून नाम फाऊंडेशन च्या मशिनरीच्या साहाय्याने व इतर व्यावसायिकांच्या मशिनरी आमदार भोसले व श्री.ज्ञानदेव रांजणे हे इंधन उपलब्ध करून देणार आहेत.अधिक माहिती देताना श्री.ज्ञानदेव रांजणे यांनी सांगितले, जुलै महिन्यात जावळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. केळघर विभागात भात हे प्रमुख पीक आहे.या पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. अतिवृष्टीमुळे विभागातील नदीकाठची शेती वाहून गेली होती. आतापर्यंत सर्वाधिक शेतीचे नुकसान या अतिवृष्टीमुळे झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व नुकसानीत शेतीची दुरुस्ती करून देण्यासाठी आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने नुकसानीत शेतीची दुरुस्ती नाम फाऊंडेशन च्या साहाय्याने करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पोकलेन व जेसिबी व्यावसायिकांची मदत यासाठी घेणार आहे. नदीकाठच्या शेत जमिनीची दुरुस्ती प्राधान्याने करण्यात येणार आहे. मशीनरीसाठी लागणारे इंधन आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले व श्री.ज्ञानदेव रांजणे उपलब्ध करून देऊन लवकराच या कामांना प्रारंभ होणार असल्याचे श्री. रांजणे यांनी सांगितले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!