मेढा नगरपंचायतीच्या करवाढीच्या विरोधात महााविकास आघाडीच्या वतीने आंदोलनाचा इशारा
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मेढा.दि.३०.मेढा नगरपंचायतीच्या वतीने आकारण्यात आलेली चतुर्थ मिळकत कर आकारणी ही अन्यायकारक व अवाजवी असून पुन्हा स्थल दर्शक पाहीनी करून ही आकारणी करावी . अन्याय कारक कर आकारणी कमी न केल्यास नगरपंचायतीच्या समोर ठिय्या आंदोलन तसेच बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा मेढा शहर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, तसेच मिळकत धारक , व मेढा ग्रामस्थ यांच्या वतीने निवेदनाद्वारे दे०यात आला आहे.
सदरचे निवेदन,जावलीचे तहसिलदार राजेंद्र पोळ मुख्याधिकारी अमोल पवार यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले आहे. या प्रसंगी सुरेश पार्टे, शिवाजीराव देशमुख, प्रकाश कदम , अरुण जवळ , सचिन जवळ , प्रभाकर धनावडे, इम्रान आतार, संजय जुनघरे, संदीप पवार, योगेश कांबळे , अभिजीत शिंगटे, संतोष पवार, ऋषिकेश शेलार इत्यादी पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्यासह मिळकत धारक ग्रामस्थ उपस्थीत होते.
गेले दोन वर्ष कोरोनाच्या अत्यंत बिकट काळात नगरपंचायतीने कर आकारणी कार्यक्रम हाती घेतला व लोकांना कर आकारणीची नोटीस वाटप सुरू केली आहे .पूर्वीच्या करापेक्षा पाचपट जादा कर आकारणी करण्यात आली असून त्यांच्या इतर शास्ती दंड लावल्याने, तसेच काही मिळकतीमध्ये फार मोठया प्रमाणावर तफावत आढळून येत असल्याने सर्वसामान्य मिळकतधारक नागरीकांचे कंबरडेच मोडले आहे.. जिल्ह्यातील अन्य तालुक्याच्या मानाने मेढा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कुठलीही औद्योगिक वसाहत नसल्याने मेढा बाजारपेठ म्हणावी तशी वाढली नाही. त्यामुळे आर्थिक उलाढाल व उद्योगधंदे , रोजगार यांना खिळ बसली आहे. तेव्हा भोगोलीक व मेढा शहरातील नागरिकांच्या आर्थिक परिस्थीतीचा विचार करता. नगरपंचायतीने आकारलेली अन्यायकारक करवाढ व लावलेले वेगवेगळे दंड व त्याची रक्कम कमी करावी.न केल्यास जंनआंदोलन करून , नगरपंचायतीसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनावरती सह्या असणारे कार्यकर्ते व मिळकत धारकांनी दिला आहे.

नगरपंचायतीची करवाढ ही अन्यायकारक असून ती स्थलदर्शक परिस्थितीचा सव्हें करून कमी न केल्यास नगरपंचायती समोर एक दिवस धरणे आंदोलन व त्यानंतर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
सुरेश पार्टे – राष्ट्रवादी कार्यकर्ते



