महाराष्ट्रसातारासामाजिक

मेढा नगरपंचायतीचे नव्याने आरक्षण जाहीर

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –

 मेढा.दि.२८. मेढा येथे कलश मंगल कार्यालयात प्रभागातील प्रभाग निहाय नवीन आरक्षण कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विजया यादव उपजिल्हाधिकारी निवडणूक रोजगार हमी योजना नियंत्रण निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमोल पवार आणि सहकारी कर्मचारी तसेच मेढा नगरातील नागरिक यांच्या उपस्थितीत संपन्न्न झाला.

प्रभागांमध्ये झालेले बदल पुढीप्रमाणे

प्रभाग क्र १ मध्ये सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र २ मध्ये सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र ३ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,प्रभाग क्र ४ मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्र ५ मध्ये सर्व साधारण महिला,प्रभाग क्र ६ मध्ये अनुसूचित जमाती महिला,प्रभाग क्र ७ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग,प्रभाग क्र ८ मध्ये सर्वसाधारण,प्रभाग क्र ९ मध्ये सर्वसाधारण,प्रभाग क्र १० नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,प्रभाग क्र ११ मध्ये अनुसूचित जाती महिला,प्रभाग क्र १२ मध्ये सर्वसाधारण,प्रभाग क्र १३ मध्ये सर्वसाधारण,प्रभाग क्र १४ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग,प्रभाग क्र १५ मध्ये सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र १६ मध्ये अनुसूचित जाती,प्रभाग क्र १७ मध्ये सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहिर झाले आहे.

नवीन पध्दतीने करण्यात आलेल्या या आरक्षणामुळे ज्या प्रभागात सर्वसाधारण उमेदवार दिला गेला होता तेथील उमेदवाराची चांगलीच गोची झाली असून आपले स्थान दुसरीकडे बळकट करण्यासाठी त्रेधा तिरपित उडत आहे. नगर पंचायतीच्या माध्यमातून राजकीय वातावरण तापणार असुन कोण बाजी मारणार पाहणे कुतूहलाचा विषय ठरणार आहे

एकंदरीत मेढा नगर पंचायतीने नव्याने १७ प्रभागाचे आरक्षण सादर केल्याने उमेदवारांनी आपली उमेदवारी जाहीर झाल्याचे समजून प्रचारात उडी घेतली आहे त्यामुळे मेढा नगर पंचायतीचा राजकीय आखाडा चांगलाच रंगणार आहे असे नागरिकांतून बोलले जात आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!