धार्मिकसातारासामाजिक

ष.ब्र.१०८ डॉ.निलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांचे सानिध्यात नवचंडी याग व शिवदीक्षा विधी सातारा येथे आयोजित

 

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ

केळघर. दि.०३ पवित्र सुरु असलेल्या श्रावण मासानिमित्त ष.ब्र.१०८ डॉ.निलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांचे सानिध्यात नवचंडी याग व शिवदीक्षा विधी वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ सातारा आयोजित समस्त वीरशैव लिंगायत समाज सातारा महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा संस्था सातारा वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळ सातारा
यांचे सौजन्य व सहकार्याने मिती श्रावण शु.८ शके १९४४ शुक्रवार दि.५/८/२२ ते मंगळवार दि.९/८/२२ पर्यंत
पाचदिवसीय श्रावण मास निमित्त विविध धार्मिक कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि.५/८/२२ रोजी सकाळी ७/३० दुर्गाष्टमी निमित्त सप्तशती पाठ व नवचंडी यागाचे आयोजन महाराजांचे प्रवचन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दि.६ रोजी सकाळी ९ वा.सामुदायिक महादेवास रुद्राभिषेकपूजा होणार आहे.तसेच बिल्वअर्चन मंगलारती सायं.५ वा शिवपाठ, होणार आहे.रविवार दि.७/८/२२ रोजी सकाळी १० वा. शिवदीक्षा संस्कार महाप्रसाद, महाराजांचे प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार दि.८/८/२२ रोजी सकाळी ९ वा.सामुदायिक सोमवार सांगता,गंगापूजन,सोळासोमवार उद्यापन
बारा ज्योतिर्लिंग पूजनदर्शन,सायं.शिवपाठ होणार आहे.
मंगळवार दि.९/८/२२ रोजी सकाळी ९ वा.महादेवास रुद्र पूजा बिल्वअर्चन मंगलारती कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.
दीक्षा संस्कार ,नवचंडी याग,सामुदायिक उद्यापणात सहभाग घेणाऱ्या शिवभक्तानी संपर्क प्रमुखांकडे आपली नावे नोंद करावी.
संपर्क : महेश स्वामी सातारा 9822918586,श्रीनिवास कामळे 9373451418,नंदकुमार गुरसाळे 9822795421,निर्मला बारवडे 7972263982,सचिन स्वामी ९८६०९१६३८९कार्यक्रमाचे स्थळ : औंधकर मठ ५०१ पाटीजवळ सातारा,दि.५ रोजी नवचंडी यागाचे अन्नदान सन्मित् सातपुते आणि परिवार सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!