
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मेढा. दि.०४ सातारा जिल्हा गटसचिव पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली जावळी तालुक्याचे श्री आनंदराव जुनघरे यांची सातारा जिल्हा गटसचिव पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड झालेबद्दल जावली तालुक्यातील सर्व सचिवांतर्फे त्यांचा सत्कार करणेत आला तसेच प्रतापगड सहकारी साखर कारखाना संचालक पदी नियुक्ती झाले बदल रामदास पार्टे व मामुर्डी सोसायटी चेअरमन पदी नियुक्ती झाले बद्दल विनोद जुनघरे यांचा सत्कार करणेत आला. सत्काराला उत्तर देताना आनंदराव जुनघरे म्हणाले आजपर्यतच्या प्रवासात जुने सहकारी स्व.काजी स्व. रामभाऊ इगावे स्व.सोपान भिलारे स्व.महामुलकर तसेच सखाराम बुवा उभे एकनाथ चौधरी मोहन कासुर्डे तुकाराम जुनघरे ओंबळे बंधु सर्वच जुने सचिव व महाबळेश्वर तालुक्यातील सचिव आणि तुम्हा सर्वांची साथ मोलाची मिळाली.सद्या संगणकाच्या युगात,सद्याचे राजकीय परिस्थीतीत सहकारात काम करणे सोपे राहीले नाही त्यामुळे यापुढे काम करीत असताना सर्वांनी एकत्र येवून काम करणे गरजेचे आहे. ज्यावेळी तुम्ही सर्वजण एकत्र याल तो दिवस खऱ्या अर्थाने माझा सन्मान झाला असे मी समजेन.
छायाचित्र : – सुनिल धनावडे
या सत्कार समारंभाच्या प्रसंगी जावली तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष अनिल धनावडे जिल्हा संघटनेचे गोपाळ बेलोशे रामदास पार्टे बापूसो धनावडे मनोज देशमाने सुनिल धनावडे गणेश वंजारी काटवलीचे बुवा विनोद जुनघरे दिपक महामुलकर तसेच सर्व सचिव उपस्थीत होते गोपाळ बेलोशे यांनी स्वागत केले दिपक महामुलकर यांनी आभार मानले .






