महाराष्ट्रसातारासामाजिक

आगामी निवडणुकांबाबत बोंडारवाडी कृती समिती आपली भुमिका लवकरच जाहीर करणार – विजयराव मोकाशी.

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज – युवराज धुमाळ

केळघर दि.४ नुकतीच केळघर येथे बोंडारवाडी धरण कृती समितीची बैठक पार पडली धरणा संदर्भात व जि.परिषद पंचायत समिती निवडणूकी बाबत भुमिका पटवून देत असताना विजयराव मोकाशी १५ जुन २०२२ ला महाराष्ट्र शासनाने १ टीएमसी क्षमतेच्या बोंडारवाडी धरणास मंजूरी दिली आहे.मात्र सरकार बदलल्यामुळे मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यावरच धरणाबाबत ची बैठक घेणे शक्य होणार आहे.दरम्यान बोंडारवाडी-भेकवली- मेटगुताड ग्रामस्थांशी पुनर्वसनाबाबत सर्वांनीच संवाद साधून धरण लवकर होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत योग्य वेळ आल्यावर सर्वांशी चर्चा करूणच निर्णय घेण्यात येईल असे प्रतिपादन धरण कृती समिती चे निमंत्रक विजयराव मोकाशी यांनी केले. केळघर येथे कृती समितीची सरकार बदलल्यानंतरची वाटचाल ठरवणे व आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत कृती समितीच्या सदस्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीत अनेक सभासदांनी मुक्त पणे आपले विचार व्यक्त केले. विशेषता मोहनराव जगताप, बजरंग चौधरी, रविंद्र सल्लक, महादेव ओंबळे, उषा उंबरकर,मंदाकिनी भिलारे ,जगन्नाथ जाधव , प्रविण कांबळे, चंद्रकांत ओंबळे, चंद्रकांत धनावडे इत्यादिंनी आपली भुमिका मांडली. या वेळी बोलताना विलास बाबा जवळ म्हणाले, तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बोंडारवाडी धरण होणे आवश्यक आहे. लोकशाही मार्गाने बदल घडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहीजे व याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आपण विजयराव मोकाशी यांना देण्यात यावेत. आदिनाथ ओंबळे यांनी डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका ,संघटीत व्हा व संघर्ष करा ह्या मंत्राचा आपण वापर केला पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी दक्षिण वेण्णा शेतकरी मंडळाचे अध्यक्ष गेणुबुवा दुंदळे, सचिव विठ्ठल पवार, हणुमंतराव शिंगटे,वसंतराव शिंदे, पांडूरग धनावडे , वैशाली शेलार, धनश्री शेलार, अमोल आंग्रे,अशोक सपकाळ, विलास शिर्के, श्रीरंग बैलकर ,राजेंद्र जाधव अशोक वांगडे तसेच ५४ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!