अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने मामुर्डी येथे शहिद वीर जवान यांच्या मातोश्रींच्या हस्ते ध्वजारोहण…

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – बजरंग चौधरी
मेढा. दि.१४.स्वातंत्र्योत्तर भारताचे अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षाचा समारोप सोहळ्याच्या निमित्ताने जावली तालुक्यातील मामुर्डी येथे शहिद जवान अशोक विठ्ठल धनावडे यांच्या मातोश्री लक्ष्मी विठ्ठल धनावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
सातारा जिल्हा सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष मामुर्डी गावचे माजी सरपंच श्री बजरंग खाशाबा चौधरी यांनी अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप सोहळ्याच्या निमित्ताने जावली तालुक्यातील मामुर्डी येथे हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियानात आपले मामुर्डी या घरी उत्कृष्ठ ध्वजारोहण केले त्यांचे घरी ध्वजारोहणाचा कार्यक्रम मामुर्डी गावचे शहिद अशोक विठ्ठल धनावडे यांच्या मातोश्री लक्ष्मी विठ्ठल धनावडे यांच्या हस्ते करणेत आला.
सदर कार्यक्रमास जि प शाळा मामुर्डी च्या बालचमुनी राष्ट्रगीत म्हणून सलामी दिली सदर कार्यक्रमास शिक्षक स्टाफ आजी माजी सरपंच सदस्य तरुण मंडळ महीला मंडळ भजन मंडळ मोठ्या संख्येने हजर होते सदर ध्वजारोहणाची संपुर्ण तालुक्यात चर्चा होत आहे. उत्कृष्ठ ध्वजारोहण केले बदल श्री केदारेश्वर भजन मंडळ तर्फे त्यांचा सन्मान करणेत आला .



