महाराष्ट्रसातारासामाजिक

जावळीच्या राजधानीत प्रशासन व जनतेचे वतीने जनसंपर्क अभियान..हर घर तिरंगा,घर घर तिरंगा

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – सुनिल धनावडे



मेढा. दि.१४. जावळीची राजधानी मेढा येथे प्रशासन व जनता मिळून हर घर तिरंगा ,घर घर तिरंगा जनसंपर्क अभियान राबवणेत आले जावळीचे कर्तव्यदक्ष तहसिलदार राजेंद्रजी पोळ मेढा पोलीस स्टेशनचे ए पि आय अमोल माने साहेब मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमोल पवार साहेब तसेच मेढा नगरीतील ग्रामस्थ यांनी मेढा येथील सर्वसामान्य जनता गांधीनगर तसेच मेढा येथे घराघरात तिरंगा ध्वज फडकवण्याचे व त्याचे पावित्र जपण्याचे आवाहन जनतेला करीत होते.

प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात येणार असला तरी ध्वजसंहितेचे पालन होणेही आवश्यक आहे घरोघरी तिरंगा लावताना काय काळजी घ्यावी तिरंग्याचा मान राखला जावा यासाठी काय करावे अशा अनेक प्रश्नाची उत्तरे नागरीकांना या मोहीमे द्वारे प्रशासनाकडून मिळत होती आपले भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अमृत महोत्सव वर्षानिमित्त घर घर तिरंगा हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकवण्याचा

तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येणारा १५ ऑगष्ट हा स्वातंत्र दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करणेचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे सदरची मोहीम घराघरापर्यंत पोहोचवताना प्रशासन व नागरिक घरोघरी लोकांना भेटुन सांगत होते तिरंगा ध्वजाचं वाटप करीत होते तसेच ही मोहीम यशस्वी करणेसाठी सुशिक्षीत लोकांनी पुढे येऊन सामान्य जनतेला समजवणे व प्रोत्साहीत करणेसाठी आवाहन करीत होते काल मेढा नगरीत पाऊसाची तुफान बॅटींग चालु असताना सायंकाळी आठ वाजेपर्यत प्रशासन व जनता अमृत महोत्सव साठी तळागाळातील लोकांना प्रोत्साहीत करीत होते सदर मोहीमेत कॅप्टन जावली चे कर्तव्यदक्ष तहसीलदार राजेंद्रजी पोळ मेढा पोलीस स्टेशनचे सन्माननीय API अमोल माने नगरपंचायत चे मुख्याधिकारी अमोल पवार तसेच विकास देशपांडे धनंजय खटावकर, सुरेंद्र पंडित,सुरेश जंगम,डॉक्टर संपतराव कांबळे, राजेंद्र मुळे, विठ्ठल देशपांडे,संजय सपकाळ तसेच इतर ग्रामस्थ घर घर तिरंगा ,हर घर तिरंगा ही संकल्पना घरा घरा पर्यंत पोहचवुन तिरंगा ध्वजा चे वाटप करीत होते

छायाचित्र :- सुनिल धनावडे

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!