
” देशाला महासत्ता बनविण्यासाठी सर्वांची एकजुट महत्वाची ..! आ. शशिकांतजी शिंदे.“
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – अभिजीत शिंगटे
मेढा. दि.२१.देश स्वतंत्र झाला पण आज खऱ्या अर्थाने पुन्हा देशाला स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. क्रांती ही संघर्षातूनच होत असते .त्या क्रांतीमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले . या क्रांतीचा आदर्श घेवून आपण सर्वजन एकत्र येवून प्रगतशील भारत घडवू या. नव्या प्रेरणेने , ध्येयाने उभे राहू या. प्रगतशील , महासत्ता भारत बनविण्यासाठी सर्वांची एकजुट करू या असे आवाहन आ. शशिकांतजी शिंदे यांनी केले.

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मेढा शहरातून ७५ फुटी तिरंगा ध्वजाच संचलन करण्यात आले. या संचलनाचे समारोपाप्रसंगी आ. शशिकांतजी शिंदे बोलत होते. या प्रसंगी त्यांनी देशाला स्वातत्र्य मिळवून देणारे शुरविर सैनिक, शास्त्रज्ञ, देशाचे नेतृत्व करणारे राजकिय मंडळी यांना अभिवाद केले. व उत्तमरित्या तिरंगा झेंडा संचलनाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांचे अभिनंदन केले. प्रारंभी आ. शशिकांतजी शिंदे , अमितदादा कदम व मान्यवरांचे शुभहस्ते ध्वजाचे पुजन करून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला .आ. शिंदे संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती अमितदादा कदम यांनीही आपल्या मनोगतातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान देणारे सैनिक , महापुरुष , लोकप्रतिनिधी यांना अभिवादन करून देशाच्या प्रगतीमध्ये जावलीचा नक्कीच सहभाग असेल. असे सुचित करून स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रत्येक नागरीकाच्या मनात देशप्रेमाची जी भावना निर्माण झाली ती अभिनंदनीय आहे. जावलीच्या युवा पिढीतून देशाचे नेतृत्व करणारे व्यक्तीमत्व घडावे अशा शुभेच्छाही व्यक्त केल्या.
मेढा, व तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भव्य दिव्य अशा ७५ फुटी तिरंगा ध्वजाच्या रॅलीचे यशस्वी आयोजन सुरेश पार्टे , प्रकाश कदम, शिवाजी देशमुख, अरूण जवळ , इम्रान आतार , संदीप पवार , मोहन देशमुख , रोहीत जाधव , श्रृषिकेश शेलार यांनी केले होते. तर माजी सभापती मोहनराव शिंदे ,प्रतापगड कारखान्याचे संचालक आनंदराव जुनघरे , जावली बॅंकेचे संचालक प्रकाश कोकरे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आतिष कदम, मेढा सोसायटी चेअरमन सुरेश दळवी , युवा नेते साधू चिकणे, सुनिलराव देशमुख ,सरपंच पुंडलीक पार्टे, नारायण शिंगटे,बबन शेलार, किसनराव जवळ,दिपक कदम, धनंजय पवार, राम कदम,संजय जुनघरे, मधुकर शेलार, प्रशांत दळवी, विशाल दुंदळे, विठ्ठल पवार (करंडी ) आदी मान्यवरांसह आ. शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद घाडगे, प्रा. संतोष कदम, प्रा. पाटील , पत्रकार सोमनाथ साखरे त्यांचे सहकारी, विद्यालयाचे विद्यार्थी , विद्यार्थीनी , देशप्रेमी नागरीक , राष्ट्रवादीचे पदाधिकारी , कार्यकर्ते, मोठया संख्येने उपस्थीत होते. सदरची तिरंगा रॅली , मेढा बसस्थानक शिवाजीनगर ते चांदणी चौक , बाजार चौक, लक्ष्मी रोड या मार्गावरुन काढून तहसिल कार्यालयाच्या मैदानावर समारोप करण्यात आला. या रॅलीचा
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश पार्टे यांनी केले तर आभार शिवाजी देशमुख यांनी मानले.



