महाराष्ट्रसातारासामाजिक

गोंदवले येथील नाटय महोत्सवात
“टेढे मेढे ” ची धमाल.. नागरीकांच्या प्रचंड प्रतिसादाने स्पर्धा चुरशीवर

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मेढा.प्रतिनिधी.अभिजीत शिंगटे – गोंदवले खुर्द येथील नाटय महोत्सवाच्या माध्यमातून नागरीकांना निखळ हास्य देणारे टेढे मेढे हे धमाल नाटक सादर केले असून नागरीकांच्या दमदार प्रतिसादाने सुरु असणारा हा नाटय महोत्सव चुरशीचा होणार असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

श्री गोपालकृष्ण जयंती उत्सव आणि श्री. गोंदवलेकर ग्रामस्थ नाटय महोत्सव यांच्या वतीने गोंदवले खुर्द येथे नाट्य महोत्सव सुरू झाला असून नवोदित कलाकारांना हक्काच व्यासापिठ म्हणुन या नाटय महोत्सवाकडे पाहिले जात आहे. मल्हार + जाई वल्लरी प्रकाशित विठू स्टुडिओ प्रस्तुत टेढे मेढे नाटकाची संकल्पना नितीन- राजेश, यांची असून याचे निर्माते चंद्रकांत पवार आहेत.लेखक रुपेश दुदम लिखीत या नाटकात सुर्यकांत गोवळे, राजेश सपकाळ, नितीन पवार, रोहीत विचारे, वैदेही करमरकर यांची भूमिका नागरीकांना मनोरंजन देणारे असून आपल्या अभिनयाची छाप पाडण्यात कलाकार यशस्वी ठरले आहेत.

गेली २९ वर्ष या नाटय महोत्सवात कलाकार आपली भुमिका दमदारपणे सादर करून दुरदर्शन तसेच सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत. या नाट्य महोत्सवाची सुरुवात ज्येष्ठ रंगकर्मी रमेश खांडेकर, जिजाबा शेडगे, बंडू पोळ, विजय ढालपे ,विजय चव्हाण, यांच्यासह गोंदवलेकर ग्रामस्थ नाटय मंडळ अध्यक्ष अर्जुनराव शेडगे सहकारी अँड पी.डी कारंडे, राजेंद्र कदम, दिपक पोळ , उपसरपंच अमोल पोळ, अच्युत कदम, विलास काळे तसेच ग्रामस्थ मंडळ गोंदवले खुर्द यांच्या सहकार्याने होत आहे.गोंदवले खुर्द येथे होणारा नाटय महोत्सव नाट्यप्रेमीकरीता एक पर्वणीच ठरत असून या नाटय महोत्सवात सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, तसेच विविध ठिकाणाहून स्पर्धक संघ आपली उपस्थिती, सहभाग नोंदवून आपली कला राधाकृष्ण रंगमंचावर
सादर करीत नाटकांचा उच्च दर्जा नागरीक, नाट्यप्रेमी यांच्यासमोर सादर करीत आहेत.

 सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू असणारा नाट्य महोत्सव कलाकारांना आणि नाट्य रसिकांना भुरळ घालणारा असून कलाकारांच्या जीवनाला कलाटणी मिळवून देणारा हा रंगमंच संपूर्ण विभागात,पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!