महाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईसामाजिक

युरोप मधिल सर्वोच्च शिखर एल्ब्रस सर करणारे अग्निशमन दलाचे श्री.प्रणित शेळके व योगेश बडगुजर यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार

मुंबई.दि.१२.ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष व वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ. संघटनेचे संस्थापक मा.डॉ.श्री.अविनाश सकुंडे यांच्या सूचनेनुसार वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ.चे राष्ट्रीय अध्यक्ष व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ व अग्निशमन दलाचे सी.एफ.ओ.श्री.हेमंत परब,डी.एफ.ओ. श्री.पाटील सर,श्री.चौधरी सर यांच्या उपस्थितीत मुंबई अग्निशमन दलात काम करत असताना अतिशय प्रतिकूल हवामानात हिंदुस्थानच्या अमृत महोत्सवा वेळीच १५ ऑगस्टला युरोपातील सर्वोच्च शिखर एल्ब्रस सर करून देशाचा राष्ट्रध्वज आणि अग्निशमन दलाचा ध्वज डौलाने फडकवनाऱ्या श्री.प्रणित शेळके व योगेश बडगुजर या जवानांचा वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ. व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी च्या वतीने मुंबई अग्निशामन केंद्र मुख्यालय भायखळा येथे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व संघटनेचे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी AIACPC चे महा.उपाध्यक्ष श्री.अमोल वंजारे,महा.सचिव श्री.अमित देशमुख,महा.महिला सचिव सौ.ज्योतीताई भोसले,मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेचे कार्याध्यक्ष श्री.शरद कुवेसकर,खजिनदार श्री.दामोदर पांडकर AIACPC चे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.अमित सुळे,ठाणे जिल्हा सरचिटणीस श्री.ऋतुकांचन रसाळ, चिटणीस श्री.सचिन जोईजोडे,WHRAF चे मुंबई जिल्हा सेक्रेटरी श्री.महेश आंब्रे,मुंबई जिल्हा महिला सरचिटणीस सौ.प्रमिला अडसूळ,मुंबई चिटणीस सौ.ऋतिका पंदुगडे,AIACPC चे मुंबई सचिव श्री.हितेश गायकवाड,सहसचिव श्री.दत्तराज आंब्रे,

श्री.लीतेश केरकर,घाटकोपर विधा. सचिव श्री.प्रकाश आंब्रे समाजसेविका सौ.अनिता पाटोळे,शिव अंगणवाडी सेनेच्या सौ.सुप्रिया ठोंबरे श्री.सुहास परब,सौ.नीता जोइजोडे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!