मेढा येथील शहाजान सय्यद बाई यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळा मेढा शाळेस शैक्षणिक साहित्य दिले भेट.

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज – विनोद वेंदे
मेढा.दि.०७ मेढा येथील पहिली असलेली जीवन शिक्षण मंदिर मेढा येथे काही दशके आपली शैक्षणिक सेवा देऊन अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले.अशा सर्व विद्यार्थ्यांचे मधे अतिशय लोकप्रिय अशा सय्यद बाई.त्यांचे सोबत त्यांचे पती निजाम सय्यद गुरुजी यांच्या खांद्याला खांदा देऊन नोकरी आणि घर सांभाळून स्वतःच्या मुलांना देखील उच्च शिक्षित केले.परंतु जसे जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला म्हणून की काय त्यांना एक वर्षापूर्वी देवाज्ञा झाली.

आज त्यांच्या प्रथम स्मृती दिना निमित्त त्यांचे कुटुंबीय आणि त्याच्यासोबत असणारे त्यांचे सहकारी देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.त्यांचे प्रथम स्मृती दीना निमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळा मेढा आणि अंगण वाडी मेढा यांना शैक्षणिक साहित्य यामधे संगणक आणि शैक्षणिक खेळणी दिली.आज देशामधे अशा प्रकारे शैक्षणिक बांधिलकी जपणारे सय्यद कुटुंबीय त्यांची मुलं राजेश आणि मिनाज यांनी केलेलं काम आणि दिलेले योगदान समाजातील लोकांनी घेणं अपेक्षित आहे.

यावेळी जिल्हा परिषद केंद्र शाळा चे शिक्षक करंजेकर गुरुजी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास सा. मा. साळुंखे गुरुजी, ता.गो.शिंदे गुरुजी.बा. ग.धनावडे.जांभळे गुरुजी उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक शेलार गुरुजी,धनावडे गुरुजी सर्व स्टाफ ,शालेय कमिटी तसेच सोमनाथ काशिलकर ,सातपुते सर ,महेंद्र साळुंखे इतर मान्यवर गुरुजी यांनी सहकार्य केले.सौ दाभाडे बाई यांनी आभार मानले



