
मेढा. दि.२८.प्रतिनिधी अभिजीत शिंगटे. मेढा विभागात काही ठिकाणी शिधा वाटप विक्रेते लाभार्थीची फसवणूक करत असून हे थांबले पाहिजे अन्यथा त्यांना मनसे स्टार्ईलने धडा शिकविणार अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
जावली तहसिल कार्यालयात जावलीचे तहसिलदार श्री. राजेंद्र पोळ यांना याबाबतचे निवेदन मनसे जावली तालुका संघटक अध्यक्ष राजेश माने,जावली तालुका उपाध्यक्ष बबन हिरवे तसेच पदाधिकारी यांचे उपस्थितीत देण्यात आले असून यात तहसिलदार यांनी लक्ष देवून याचे गांभिर्य लक्षात घेवून तातडीने कार्यवाही करुन लाभार्थी यांना नुकसानापासून वाचवावे अशी विनंती करण्यात आली आहे.
या निवेदनात शिधावाटप दुकानदार यांना केंद्र शासनाकडून सर्व शिधा वाटप तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांस ३० डिसेंबर २०२२ च्या पत्रानुसार शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत लाभार्थी यांना ३ रु प्रती किलो दराने तांदुळ, २ रु प्रती किलो दराने गहू, व १ रु प्रती किलो प्रमाणे भरड धान्य हे सर्व १ वर्ष करीता म्हणजे १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्णपणे मोफत वाटप करण्यास सुचित करण्यात आले असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे.
परंतु मेढा विभागातील काही शिधा वाटप दुकानदार हे लाभार्थी यांचकडून प्रती किलो १ रुपये प्रमाणे व रेशनिंग कार्ड मागे ५ रुप्रमाणे आकारणी करत असून याचा जाब विचारता असता आम्हाला हमालीचे पैसे व इतर काही खर्च लागतो तो कोठून आणायचा असे उत्तर दिले जात आहे.
तरी सदरच्या निवेदनाचा गाभिर्याने विचार करून सदर लाभार्थी यांची होणारी फसवणुक थांबवावी अन्यथा शिधा वाटप धारक यांना मनसे स्टाईलने धडा शिकविला जाईल असे
अध्यक्ष व मनसे जावली तालुका संघटक श्री.राजेश माने यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्ष
मनसे जावली तालुका संघटक
शिधा वाटप दुकानदारांनी शासनाच्या नियमानुसार कामकाज पार पाडणे महत्वाचे आहे. लाभार्थी यांचेकडून जादा प्रकारची रक्कम न घेता आपले कार्य सुरू ठेवावे आणि शासनाने दिलेल्या आदेशाची प्रत आपल्या दुकानात प्रथम दर्शनी होईल अशी लावून जादा रुपयांची आकारणी न करता धान्य वितरण करावे ही आमची मागणी आहे.



