महाराष्ट्रसातारासामाजिक

दक्षिण जावली विभागातील निझरे येथे यात्रेनिमित्त भव्य कुस्तीच्या मैदानाचे आयोजन

मेढा.दि.३१.जावली तालुक्यातील दक्षिण जावली विभागातील निझरे येथे सालाबादाप्रमाणे होणाऱ्या या वर्षी मोठ्या उत्साहात यात्रा साजरी करण्यात येणार आहे.

या वर्षी शनिवार दिनांक ०४/०१/२०२३रोजी सकाळी ०६ ते ०९ वाजेपर्यंत सुस्वर भजनाचा कार्यक्रम होणार आहे, मरीआईचा अभिषेक दुपारी १२ वाजता व देवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे,तसेच सायंकाळी ६ ते ८ देवीचा गोंधळ रात्री ९ ते १२ छबिना व गावातून पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे रात्री १२ते ३ तमाशा रविवार दिनांक ५-२-२३ रोजी सकाळी ९ ते ११ वाजता दंडस्थान चा कार्यक्रम दुपारी १२ते ४ लोकनाट्य तमाशा सायंकाळी ४ ते ७ जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम रात्री ९ ते १२ ऑर्केस्ट्रा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन निझरे ग्रामस्थ व श्री गणेश विकास मंडळ निझरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सालाबाद प्रमाणे यात्रेमध्ये यावर्षी ग्रामस्थ मंडळ व श्री गणेश विकास मंडळ निझरे यांच्या वतीने भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे.जिल्ह्यात पैलवानांसाठी प्रसिद्ध असलेल्या निझरे गावामध्ये एकही कुस्ती क्षेत्रात पैलवान नाही याची खंत गावातील ग्रामस्थ सर्व परिसरातील नागरिकांना होत आहे. यामुळेच कुस्ती या खेळाला यात्रे मार्फत नवसंजीवनी देण्याचा ध्यास गावातील तरुण वर्गांनी घेऊन यावर्षी होणाऱ्या यात्रेमध्ये जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे.कुस्त्यांचा मोठा फड म्हटला की पैलवानांसाठी बक्षीसे आणि फडाची तयारी यासाठी मोठा खर्च आलाच. यात्रेचे आयोजन करताना मंडळावर या कुस्त्यांच्या फडाचा अतिरिक्त भार पडू नये म्हणून गावातील तरुणांनी प्रायोजकत्वाची विशेष जबाबदारी स्वीकारली आहे.कुस्त्यांचे मोठे मैदान आयोजन करण्यात सातत्य रहावे यासाठी श्री गणेश विकास मंडळाने स्वतंत्र कुस्ती कमिटी नेमणूक केलेली आहे आणि पुढील पाच वर्षासाठी मोठ्या कुस्त्यांच्या आयोजनासाठी या कमिटीकडे जबाबदारी दिलेली आहे.

    या वर्षी होणाऱ्या यात्रेमध्ये आयोजित केलेल्या कुस्त्यासाठी विशेष प्राधान्य जावली तालुक्यातील पैलवानांना देण्यात आलेले आहे. निझरे गावाच्या मानाची गदा विराज भोसले (तालीम संघ मालचौंडी )विरुद्ध निखिल जाधव (क्रीडा प्रबोधिनी सातारा- भोसरी)या जोडीमध्ये जंगी लढत होणार आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!