महाराष्ट्रशैक्षणिकसातारा

स्काऊट जीवनशैली अंगीकारून प्रत्येकाने आपला विकास साधावा… गट विकास अधिकारी अरूणजी मरभळ

महाबळेश्वर.दि.३१.सातारा जिल्हा परिषद सातारा,भारत सातारा स्काऊट आणि गाईड कार्यालय सातारा आणि शिक्षण विभाग पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाबळेश्वर तालुकास्तरीय कब बुलबुल आणि स्काऊट गाईड एक दिवसीय शिबीर इलाबेन महेता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तळदेवच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले.

      आज मंगळवार दिनांक ३१ जानेवारी,२०२३ रोजी पंचायत समिती महाबळेश्वर शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि गिरिस्थान नगरपरिषद शाळांतील कब – बुलबूल, स्काऊट – गाईड बालसैनिकांचे एकदिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले. सदर शिबीरासाठी मार्गदर्शक म्हणून भालचंद्र सोनावणे, एल्.टी.कब श्रीमती कविता चौगुले, गाईड संघटक,बी.व्ही.राठोड स्काऊट संघटक,सुरेश चव्हाण, ए.एल्.टी. स्काऊट,आणि उमेश मिसाळ, कार्यालय सहाय्यक यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.

सकाळच्या सत्रात सर्व शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर स्काऊटच्या परंपरेनुसार ध्वजारोहण करण्यात आले.तद्नंतर प्रार्थना, ध्वजगीत गायनाने शिबीरास सुरूवात झाली. सदर शिबीराचे उद्घाटन महाबळेश्वर तालुक्याचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी अरूणजी मरभळ यांच्या शुभहस्ते स्काऊट चळवळीचे जनक बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी आनंदजी पळसे साहेब गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती महाबळेश्वर आवर्जून उपस्थित होते. तसेच प्रकाश भिलारे,दीपक चिकणे,दिलीप जाधव, केंद्रप्रमुख उपस्थित होते. तसेच सातारा जिल्हा स्काऊट कार्यालयातील भालचंद्र सोनावणे, एल्.टी.कब, कविता चौगुले, गाईड संघटक,बी.व्ही.राठोड, स्काऊट संघटक,सुरेश चव्हाण, ए.एल्.टी. स्काऊट,आणि उमेश मिसाळ, कार्यालय सहाय्यक आणि संजय संकपाळ,संचालक,प्राथमिक शिक्षक सहकारी बँक,सातारा उपस्थित होते.

या शिबीरास इलाबेन महेता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तळदेव शाळेचे प्राचार्य आर्.एस्. पवार सर यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा समन्वयक गणेश शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका क्रीडासमन्वयक श्री.शिवाजी निकम यांनी केले.
कब आणि बुलबूल युनिट श्री तळेश्वर मंदिराच्या प्रांगणात क्रमबद्ध ६ -६ जणांच्या रांगेत उभे राहून टाळ्यांच्या विविध प्रकारांचा सराव घेण्यात आला. यानंतर कब बुलबूलचे नियम, वचन, वंदन, हस्तांदोलन, कबचे गीत, प्रार्थना, गोलातील मनोरंजक खेळ, तारा व मोगलीची गोष्ट, बडी सलामी व जंगी आरोळीचा सराव घेण्यात आला. सदर युनिटला भालचंद्र सोनावणे, एल्.टी.कब यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.


तर स्काऊट आणि गाईड युनिटला विद्यालयाच्या प्रांगणात कविता चौगुले, जिल्हा संघटक, गाईड आणि सुरेश चव्हाण, ए.एल्.टी. स्काऊट यांचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये त्यांनी स्काऊट नि गाईडचे वचन, ध्येय, नियम, हस्तांदोलन, अभ्यासक्रम उजळणी, प्रार्थना, ध्वजगीत, विविध खेळ, गाणी, प्रथमोपचार, गाठीचे प्रकार आणि टाळ्यांचे प्रकार तसेच मागाच्या खुणा, जंगलभ्रमंती व त्यामधील आठवणी, बेडन पॉवेल यांचे जीवनचरित्रातील प्रसंग, बलोपासना, संदेशन पद्धती इ.बाबत सखोल मार्गदर्शन केले.दुपारी विद्यालयाच्यावतीने सर्व बालसैनिक व मार्गदर्शक शिक्षकांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. सर्वांनी या भोजनाचा आस्वाद घेतला.

समारोप सत्रात सर्व सहभागी शाळांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सरतेशेवटी शिबीराचा समारोप ध्वजावतरण व राष्ट्रगीत गायनाने करण्यात आला.सदर शिबीराच्या यशस्वितेसाठी कोयना एज्युकेशन सोसायटी, तळदेवच्या सर्व पदाधिकारी यांचे अनमोल मार्गदर्शन व शुभाशीर्वाद लाभले. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील सर्व केंद्रांचे क्रीडासमन्वयक,ढाणे सर,चंद्रकांत जंगम सर,संकपाळ सर व सर्व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक यांचेही याकामी अपेक्षित सहकार्य लाभलेमुळे हे शिबीर यशस्वीपणे पार पडले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!