मुंबई व नवी मुंबईसामाजिक

दिघा येथे दि.२५ पासून विविध स्पर्धा व महिलांसाठी भव्य हळदी कुंकवाच्या समारंभाचे आयोजन

 

प्रतिनिधी / दिनेश हुल्ले

          नवी मुंबई दि.१९   शिवसेना दिघा नवी मुंबई, नविन गवते मित्र मंडळ,व एकता मित्र मंडळ आयोजित मा.स्थायी समिती सभापती श्री नविनजी गवते यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ.अपर्णा गवते, नगरसेविका सौ.दिपा गवते,समाजसेवक श्री राजेश गवते, यांच्या सहकार्याने दिघा वासियांसाठी विविध स्पर्धा तसेच हळदी कुंकवाच्या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, दि. २५.०२.२०२२ शरीर सौष्ठव स्पर्धा नवी मुंबई श्री २०२२ व शरीर सौष्ठव स्पर्धा दिघा श्री चे आयोजन करण्यात आले आहे, तसेच शनिवार दि. २६.०२.२०२२ डान्स दिघा डान्स एकेरी व दुहेरी व सामुहिक डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.रविवार, दि. २७.०२.२०२२ दिघा विभागातील महिलांसाठी व महिला बचत गटांकरीता हळदी कुंकू समारंभानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रम,महिलांकरिता भारतातील विविध राज्यांतील पारंपारिक पोशाख फॅशन शो स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा व मेहंदी स्पर्धा ,आणि संगीत खुर्ची,तळ्यात मळ्यात,चमच्याने पाण्याचा ग्लास भरणे,रिंगवर गोटया ठेवणे,पीन मध्ये रखर ओवणे,स्ट्रोने वटाने उचलणे. (विशेष स्पर्धा ) नवरा-बायको जोडीचे खेळ :- १)दोघांचे पाय बांधून धावणे (२) कमर मट्टा बांधणे.या सर्व स्पर्धांचे आयोजन हिंदमाता शाळेसमोरील मैदान,दिघा येथे करण्यात आले आहे.तसेच किल्ले स्पर्धांचे पारितोषिक व १० वी, १२ वीतील ९०% च्या वर गुण मिळालेल्या विदयार्थाना टॅब वाटप करण्यात येणार आहे.

 यावेळी कै.मोरेश्वर का.गवते व कै.कल्पना मो.गवते यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका लोकापर्ण सोहळा संपन्न होणार आहे,

स्पर्धांच्या बक्षिस वितरण व खास हळदी कुंकवाच्या समारंभास प्रमुख उपस्थिती

सिने अभिनेता अंकुश चौधरी व फैजल खान डान्स इंडिया डान्स विजेता

हळदी कुंकवाच्या समारंभास व सर्व स्पर्धांच्या बक्षिस वितरण करण्यास प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवर व पदाधिकारी तसेच सिने अभिनेता अंकुश चौधरी व फैजल खान डान्स इंडिया डान्स विजेता हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. दिघा विभागातील सर्व नागरीकांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे निवेदन नगरसेविका सौ.अपर्णा गवते व नगरसेविका सौ.दिपा गवते यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!