युवराज धुमाळ
मेढा .दि. १९ मेढा ता.जावली येथे आज आरपीआयच्या वतीने सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करून व शिवरायांना वंदन करून मेढा येथील बाजार चौका मध्ये शिवजयंती मोठया उत्साहत साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र आरपीआय सचिव चंद्रकांत दादा कांबळे, जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, मेढा नगराध्यक्ष पांडूरंग बापू जवळ, जिल्हाध्यक्ष संजय तात्या गाडे,उपाध्यक्ष कैलास बापु परिहार, वंचित आघाडी अध्यक्ष प्रशांत मोरे, तालुका युवा अध्यक्ष विशाल भोसले, जिल्हा युवा अध्यक्ष सुहास मोरे,जावली तालुका अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड,जेष्ठ पत्रकार नारायणराव शिंगटे, जावली तालुका शिवसेना प्रमुख विश्वनाथ धनावडे, सचिनजी जवळ, सचिनजी करंजेकर, संतोष वारागडे, पत्रकार सुर्यकांत पवार,तसेच तमाम शिवसैनिक तसेच आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.



