महाराष्ट्रसातारासामाजिक

चंद्रपुर येथिल शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत श्रेयसने मिळविले सुवर्णपदक

मेढा.दि.१४. चंद्रपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत श्रेयसने सुवर्णपदक मिळवत आपल्या यशाची परंपरा पुढे चालू ठेवली.

चंद्रपूर ( भद्रावती ) येथे झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत क्रांती अकॅडमीच्या कु. श्रेयस राजेंद्र यादव याने १४ वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्णपदक मिळवले आहे. त्याला क्रांती अकॅडमीचे प्रशिक्षक विनोद दाभाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.श्रेयस चे वडिल राजेंद्र यादव फायर, फायटिंग बिजनेस कामकाज पाहतात तर आई अर्चना या प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा येथे कार्यरत आहेत.

या यशाबद्दल त्याचे व प्रशिक्षक यांचे क्रांती अकॅडमीचे अध्यक्ष रविंद्र ढोणे, उपाध्यक्ष अजय जाधव तसेच अभिजीत ढोणे, युवराज भारती, शांताराम चव्हाण, संजय जाधव, दिपक कदम, राजेंद्र चोरगे, विजय शिंदे,राहूल कडव तसेच रविवार पेठ सातारा येथिल नागरीकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राजेन्द्र यादव सर

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!