जावली तालुका ग्रामीण औद्योगिक विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संस्थेच्या चेअरमनपदी संतोष कासुर्डे यांची तर व्हा.चेअरमन पदी राजेंद्र गोळे यांची निवड

केळघर.दि.१४ जावली तालुका ग्रामीण औद्योगिक विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संस्था मेढा या संस्थेच्या चेअरमनपदी संतोष बाजीराव कासुर्डे ( केळघर )यांची तर व्हा . चेअरमन पदी राजेंद्र तुकाराम गोळे ( हातगेघर ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणुक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस नवनिर्वाचित संचालक मधुकर विठ्ठल पवार सनपाने , रघुनाथ सीताराम जवळ जवळवाडी ,विजय सर्जेराव खरात मोरावळे ,सोमनाथ भैरू साखरे मेढा ,पुष्पा जगन्नाथ चिकने कुसुंबी , कल्पना संभाजी कदम कुसुंबी , चित्तरंजन मारुती गोरे मेढा ,संजय भिकाजी कांबळे सावली , नितीन संपत सोनटक्के कुसुंबी, संस्थेचे सचिव श्री . वारुणकर आदि उपस्थित होते.
सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मार्गदर्शनाखाली जावली तालुका ग्रामीण औद्योगिक विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संस्था मेढा या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवाजी गोरे , संजय जुनघरे आदिनी विशेष प्रयत्न केले .
संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण व अर्थसहाय्य देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील असे नूतन चेअरमन संतोष कासुर्डे , व्हा . चेअरमन राजेंद्र गोळे यांनी सांगितले.



