
केळघर.दि.१४.आंबेघर तर्फ मेढा येथे शनिवारी रात्री १० वाजता दुकानाला अचानकआग लागली होती.या आगीत अंदाजे १२ ते १५ लाख रुपये किमंतीचे साहित्य भस्मसात झाले आहे असा अंदाज दुकानाचे मालक सुभाष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

आंबेघर येथे सुभाष किराणा अँड जनरल स्टोअर मध्ये शनिवारी रात्री १० च्या सुमारास अचानक धूर आणि आगीचे लोट येऊ लागले. थोड्या वेळातच आगीने रौदरूप धारण केले.या लागलेल्या आगी मध्ये किराणा माल, फर्निचर, इलेक्ट्रिक समानाबरोबर इमारतीचे ही नुकसान सह अनेक कंपन्यांचा मालाचा साठा जळून खाक झाला.
आग आटोक्यात आणण्यासाठी सातारा येथिल नगर पालकेतील अग्निशमन साठी फोन केला होता पण अग्निशमन गाडीची वाट न पाहता गावातील लोकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले, काही वेळातच येथिल तरुणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी दुकानाच्या आत जावून आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत हळू हळू आग आटोक्यात आणली आणि आग विझवण्यात यश मिळविले.लागलेली आग शॉर्टसकिर्टमुळे लागली असावी,असा अंदाज तेथील नागरिकांनी तसेच आग विझविनाऱ्या युवकांनी व्यक्त केला.



