महाराष्ट्रसातारासामाजिक

राष्ट्रमाता जिजाऊ आदर्शमाता पुरस्कार श्रीमती पार्वती जवळ यांना जाहीर

 

मेढा. दि.२२.जावली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक श्री विलासबाबा जवळ यांच्या मातोश्री,श्रीमती पार्वती शंकर जवळ (जवळवाडी) यांना ॲग्रोन्युज परिवार फलटण यांचे वतीने आदर्शमाता पुरस्कार जाहीर झाला आहे.

श्रीमंत मा.रामराजे नाईक -निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोमवार दि.२७ फेब्रुवारी २०२३ रोजी मराठी राजभाषा दिन या दिवशी राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार देवून फलटण येथे सन्मानित करण्यात येणार आहे.पार्वती जवळ यांनी अत्यंत खडतर परस्थितीत संघर्षमय जीवन जगत आपल्या मुलांना घडविण्याचे काम केले आहे.विलासबाबा जवळ यांच्या कार्यातून त्यांनी दिलेले संस्कार दिसून येतात. ज्या आईला व्यसनाधिनतेचे चटके सोसावे लागले अशा मातेच्या हयातीतच संपूर्ण तालुका दारू दुकानमुक्त करण्याचे काम विलासबाबांनी महिलांच्या माध्यमातून करून दाखविले. अतिशय कष्टमय जीवन जगत असताना पार्वती आईंनी मोलमजूरी करीत अगदी बिगारी काम सुध्दा केले.

वयाच्या ८१ व्या वर्षात सुध्दा शेतात राबण्याचे काम त्यांनी कमी केलेले नाही अशा या मातेला ॲग्रोन्युज परिवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने सोमवार दि.२७ फेब्रुवारी रोजी विधान परिषदेचे मा.सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर,जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत फलटण येथे गौरविण्यात येणार असल्याचे मुख्य संयोजक प्रकाश महाराज सस्ते यांनी जाहीर केले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!