गांजे (लिगाडेवाडी) येथे लक्ष्मी नारायण शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
मेढा. दि.26.19 फेब्रुवारी 2023 रोजी गांजे लिगाडेवाडी येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या विचारांचा, शौर्याचा वारसा जपण्यासाठी शिवजयंती उत्सव तरुण मंडळ, ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्व तरुण मुले व मुली यांच्या योगदानामधून किल्ले पन्हाळगड ते गांजे लिगाडेवाडी या मार्गावरून शिवज्योत आगमन करण्यात आले.
मेढा गांजे लिगाडेवाडी या मार्गावरून भव्य अशी शिवरायांच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. शिवजयंती उत्सवानिमित्त तरुण मुले आणि मुली यांनी ग्राम स्वच्छता अभियान राबविले आणि गावात स्वच्छतेचा मंत्र दिला. जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थ्यांकरिता शिवराय व मावळे यांच्या शौर्य कथांच्या आंतरशालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये 12 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि अतिशय उत्कृष्ट अशा कथा सादर केल्या सर्व मुलांमधून प्रथम चार क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा शिवमूर्ती, जनरल नॉलेज पुस्तक आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
प्रथम क्रमांक -दुर्गा सर्जेराव चिकणे.( जि.प.शाळा लिगाडेवाडी ) द्वितीय क्रमांक – अरव गणेश वांगडे ( जि.प.शाळा पिंपरी ) तृतीय क्रमांक- आयुष चंद्रकांत मोरे ( जि.प.शाळा लिगाडेवाडी )चतुर्थ क्रमांक – आराध्य शिवाजी पवार ( जि.प.शाळा सांगवी ) तसेच सहभागी सर्व मुलांना ज्ञानरूपी वसा म्हणून पुस्तके भेट देण्यात आली.
परिसरातील शाळा मधील शिक्षक, पालक यांनीही सहभाग घेतला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिगाडेवाडी मधील मुलांनी व्यसनमुक्ती वर आधारित बोधपर नाटिका सादर करून समाज जागृती केली. परिसरातील सर्व ग्रामस्थ महिला तरुण याच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी अतिशय खेळीमेळीच्या आनंदाच्या वातावरणात कार्यक्रमात सहभाग घेतला. गावातील सर्व वातावरण शिव विचारांनी आणि प्रेरणेने चैतन्यमय झाले होते.



