जावलीसामाजिक

विकास सेवा सोसायटीच्या सचिवांचे कार्य आदर्शवत…..नानासाहेब रूपनवर

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——


कुसुंबी. दि.०५. शेतकऱ्यांची अर्थवाहीनी म्हणजे विकास सेवा सोसायटी जावळीत एकूण ४९ विकास सेवा सोसायट्या आहेत त्यापैकी सन २०२२/२३ या पिक हंगामातील कर्जवाटप व कर्जवसुली अनुषंगाने चालु पिक कर्ज हंगामा अखेर संस्था पातळीवर सरताळे, बेलवडे बु ॥ , मालचौडी, भैरवनाथ नवगाव कसबे बामणोली या चार संस्थांची सोसायटी पातळीवर १००% वसुली केली आहे.


तसेच एकूण ४९ सोसायटी पैकी ४० सोसायट्या मेढासेंटर, करंजे , मामुर्डी,केळघर ,गांजे , मालचौडी, बिभवी ,ओझरे , भणंग ,मोरावळे , आलेवाडी ,मार्ली / भालेघर, हुमजाई हुमगाव, श्रीराम आखाडे ,कुडाळ , भिवडी, सरताळे, म्हसवे, सोमर्डी शेते, आर्डे,बेलवडे बु, सर्जापुर, सायगाव ग्रुप, आनेवाडी, रायगाव,करंदी तर्फे कुडाळ, इंदवली,दरे खुर्द, महीगाव, काटवली, जयभवानी केळघर तर्फे सोळशी ,सोमजाई आपटी , वालुथ, खर्शी बारामुरे, भैरवनाथ खर्शी तर्फे कुडाळ ,हातगेघर, महु, पिंपळी, बामणोली तर्फे कुडाळ भैरवनाथ बामणोली या सोसायट्यांची वसुली बँक पातळीवर १००% झाली आहे. त्याबद्दल विभागिय कार्यालय जावळी मेढा तर्फे मेढासेंटर सोसायटीचे सहकार मंदिर सभाग्रुहात सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता.

या प्रसंगी जावळीचे सहाय्यक निबंधक नानासाहेब रूपनवर यांचे हस्ते व विभागीय विकास अधिकारी आण्णासाहेब फरांदे यांचे उपस्थीतीत पात्र सचिवांचा सत्कार करणेत आला त्या प्रसंगी विक्री वसुली अधीकारी संजय निकम सर्व विकास अधिकारी दत्तात्रय दुर्गावळे,नारायण जाधव, प्रकाश झोरे,अजित शिर्के , तसेच सर्व विकास सोसायटीचे सचिव हजर होते प्रस्तावीक विभागीय विकास अधिकारी आण्णासाहेब फरांदे यांनी केले आभार रामदास पार्टे यांनी मानले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!