
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —-
मेढा. दि.१९.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जावली तालुक्यातील बिभवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण ९ विद्यार्थी परीक्षेस बसली होते.

त्यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले होते. पात्र झालेल्या पैकी २ विद्यार्थी जिल्हास्तर शिष्यवृती धारक झाले आहेत. ज्यामध्ये राज मोहन गुळंबे व अर्णव ज्ञानेश्वर चव्हाण या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ.दिपाली सुधाकर दुंदळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर ज्ञानेश्वर वेंदे,अर्चना गोळे, सुनीता कामटे व अमिता एरंडे यांचेही मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, शिक्षणविस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, चंद्रकांत कर्णे,केंद्रप्रमुख संपत धनावडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग शिंदे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,ग्रामस्थ मंडळ बिभवी आणि रिटकवली यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.




