महाराष्ट्रसातारासामाजिक

मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटे व इतर गोष्टींच्या माध्यमातून सक्षम व्हावे…..शितल जानवे खराडे

   स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

कुडाळ दि.२८ मा.ना.श्री शंभूराजे देसाई गृहराज्यमंत्री महाराष्ट्र मा.श्री.अजय कुमार बंसल एस. पी. सातारा यांच्या मार्गदर्शनानुसार डिवायएसपी मा.शीतल जानवे – खराडे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.अमोल माने यांच्या प्रयत्नातून जावळी तालुक्यातील विविध शाळांमध्ये सध्या मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे बरोबरच इतर अत्यावश्यक गोष्टींचे प्रशिक्षण दिले जात आहे .

या प्रशिक्षणासाठी श्री. अमोल माने मा.मेणकर मॅडम (API) यांच्याबरोबरच संपूर्ण पोलीस स्टाफ गेले अनेक दिवस विविध शाळांमध्ये कराटे ट्रेनर कु. प्रीती गोंधळी यांचे प्रशिक्षण कार्यक्रम घेत आहेत. या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमाचा समारोप दत्तगुरू मंगल कार्यालय कुडाळ येथे संपन्न झाला .यावेळी सर्व पोलिस अधिकारी , जिल्हा परिषद स्टाफ ,श्री.सोमनाथ कदम -उपसरपंच ,अविनाश गोंधळी सर ,महेश पवार,महेश कदम सोबत विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थिनी , ग्रामस्थ उपस्थित होते .

शाळा-कॉलेज तसेच विविध कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या मुली यांना होणारी छेडछाड व विविध अत्याचारांच्या बाबतीत सजग राहून कशा प्रकारे प्रतिकार करता येईल . याबाबत सर्व उपस्थितांनी मार्गदर्शन केले , त्याचबरोबर मुलींनी गेले आणि दिवस घेत असलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
तसेच गेले अनेक दिवस एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यासाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून येणाऱ्या परीक्षा कालावधी मध्ये मुलींना तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा स्थळी वेळेवर पोहचण्यासाठी चर्चा झाली . त्यावेळी कुडाळ पोलिस दूरक्षेत्रामध्ये श्री. मेटकरी व घोरपडे यांच्या सहकार्यातून सोमनाथ कदम व महेश पवार मित्र परिवार तसेच गजराज मित्र मंडळ , साई चौक मित्र मंडळ व आपलं पिंपळबन यांच्यावतीने परीक्षा कालावधी दरम्यान कुडाळ- पाचवड- भुईंज अशा पद्धतीमध्ये मोफत परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे .

या उपक्रमाचे उपस्थित अधिकारी वर्गाच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल देऊन संचालन करण्यात आले. व कौतुक करण्यात आले . याच पद्धतीमध्ये असे उपक्रम परीक्षा कालावधीमध्ये आजूबाजूच्या विविध गावांमध्ये राबवण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!