महाराष्ट्रसातारा

सातारा-मेढा रस्त्यावर भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाल्याचे वृत्त

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मेढा . दि.२८ सातारा-मेढा– महाबळेश्वर रस्त्यावर आज रात्री चिंचणी गावच्या हद्दीतील वळणावर एका दुचाकी आणि चार चाकी गाडीचा अपघात होऊन एक जण जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे.

चारचाकी गाडीने दुचाकीस धडक दिल्याने ही दुचाकी रस्त्यापासून 25 फूट अंतरावर फेकली गेली. तर चार चाकी गाडी एका घराच्या भिंतीवर जाऊन आदळली. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून चार चाकी वाहनाची मोठे नुकसान झाले आहे.

या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने दवाखान्यात दाखल करण्याची व्यवस्था केली. संबंधितअपघातात ठार झालेला युवक हा जावली तालुक्यातील एका गावचा रहिवासी असून त्याचे नाव चिकणे असल्याचे समजते याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!