
स्टार११ महाराष्ट्र प्रतिनिधी — राजेश सोंडकर
महाबळेश्वर.दि.१४.महाबळेश्वर नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पदाचा पदभार योगेश बाळकृष्ण पाटील यांनी स्वीकारला.यापुर्वी संभाजी नगर जिल्ह्यातुन फुलांब्री नगर पंचायत,सांगली जिल्ह्यातील शिराळा या ठिकाणी मुख्याधिकारी पदाची धुरा त्यांनी सांभाळली होती.
नवनियुक्त मुख्याधिकारी पाटील यांनी पदभार स्वीकारल्या नंतर महाराष्ट्र पत्रकार संघ महाबळेश्वर मधील पत्रकारांनी भेट घेऊन मुख्याधिकारी पाटील यांचा पुष्पगुच्छ,शाल देऊन सत्कार करत संवाद साधला.यावेळी ते म्हणाले की,महाबळेश्वर हे एक सुंदर आणि पर्यटन स्थळ आहे.येथिल नागरिकांची समस्या सोङवण्यासाठी आणि शहराचा विकास करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख राहुल शेलार,तालुका अध्यक्ष राजेश सोंङकर,उपाध्यक्ष चैतन्य दवे,कार्याध्यक्ष रियाज मुजावर,खजिनदार मिलिंद काळे आदि उपस्थित होते.



