महाराष्ट्रशैक्षणिकसातारा

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्याकरता प्रायव्हेट गाड्यांची स्वखर्चाने केली सोय

स्टार११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – एस पवार

कुडाळ.दि.०३ आज कुडाळ गावचे उपसरपंच सोमनाथ कदम यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्याकरता प्रायव्हेट गाड्यांची स्वखर्चाने सोय करून विद्यार्थिनींना पाचवड या परीक्षा केंद्रावर सोडण्यात आले आहे.हा उपक्रम पोलीस परिक्षेत्र कुडाळ आणि कुडाळ गावचे उपसरपंच सोमनाथ कदम,पिंपळबन समितीचे अध्यक्ष महेश पवार, पिंपळबन सदस्य महेश कदम यांच्या माध्यमातून साकारला जात आहे.

पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांच्याकडून सर्व वाहतूकदारांना अशी विनंती करण्यात आली आहे की जर परीक्षा केंद्रावर मुला-मुलींना पोहाचन्या करता अडचणी निर्माण होत असतील तर त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत त्या -त्या गावातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी मदत करावी.त्याचप्रमाणे कुडाळ ते पाचवड अशी वाहतूक करून मुलींना पाचवड परीक्षा केंद्रावर संपूर्ण बारावीचे व दहावीचे पेपर पूर्ण होईपर्यंत त्यांना सोडण्याची व आणण्याची सोय केली जाणार आहे.तसेच सोनगावचे श्री विकास शिंदे यांच्यामार्फत ही कुडाळ ते मेढा या मार्गावरील मुला-मुलींसाठी ना नफा,ना तोटा या तत्वावर वाहतूक सेवा केली जात आहे.

तसेच सोमनाथ कदम यांनी आवाहन केले आहे की विद्यार्थ्यांसाठी कोन मदत करणार असतील तर अशा सर्वांनी पुढे येऊन फूल ना फुलाची पाकळी या माध्यमातून मदत करावी. बामणोली येथील ग्रामस्थांनी सोमर्डी ते पाचवड सेवा करण्यास उपसरपंच सोमनाथ कदम यांना विनंती केली आहे. या वाहतुकी मध्ये सहकार्य करणारे पप्पू गोंधळी,सचिन माळेकर, गजूकाका गोंधळी, गजराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते, साई चौक मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ या गावातील अनेक मंडळांतर्फे सहकार्या केले जात आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!