महाराष्ट्रराजकीयसातारा

चंद्रकांत ओंबळे यांचा प्रतापगड कारखान्याच्या संस्थापक सहकार पॅनेलला जाहिर पाठिंबा

 स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – 

   केळघर.दि.०६   प्रतापगड सह.साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मी बाहेरगांवी असल्याने महाबळेश्वर ऊस उत्पादक गट              क्र.५ या गटामध्ये माझा उमेदवारी अर्ज निवडणूक  प्रक्रियेत शिल्लक राहीला आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी. या विचाराशी मी सहमत होतो. आज कारखाना बंद स्थीतीत असताना सर्व सभासदांना मतदान प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे . मी माझा पाठींबा संस्थापक पॅनेलला जाहीर करीत असून मतदारांनी संस्थापक पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन चंद्रकांत विठोबा ओंबळे यांनी केले आहे.

      मेढा येथे झालेल्या बैठकिमध्ये त्यांनी आपला पाठींबा व्यक्त केला असून यावेळी माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड.शिवाजीराव म मर्ढेकर माजी उपसभापती कांतीबाई देशमुख पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पार्टे, उमेदवार आनंदराव जुनघरे ,दिलीप वांगडे, बाळकृष्ण निकम त्याचप्रमाणे संतोष वारागडे, बाळासाहेब ओंबळे ,मारुती जुनघरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!