आरोग्य विषयीमहाराष्ट्रसातारा

महिलांच्या आरोग्यासाठी जवळवाडी ग्रामपंचायत विशेष लक्ष देणार

स्टार११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ

मेढा. दि.०८ महिलांनी आपल्या आरोग्यासाठी चौकस आहार घ्यावा. आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे . आपल्या बरोबरच आपल्या कुटुंब सक्षम करावे व पुढील काळातही महिलांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायत विशेष लक्ष देईल असे आश्वासन जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा सतिश मर्ढेकर यांनी दिले.

भैरवनाथ मंदिर जवळवाडी येथे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर तसेच , अंगणवाडी सेविका व बचतगटाच्या अध्यक्षा यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलें होते. सदरच्या आरोग्य शिबिरासाठी डॉ चंद्रकांत यादव,डॉ केदार कुलकर्णी,डॉ नाईक,डॉ विशाखा कदम,डॉ माधवी अडसूळ,डॉ प्रिया कांबळे,श्री विशाल रेलेकर,श्री संतोष पांढरे, जवळवाडी सरपंच सौ सुरेखा मर्ढेकर, उपसरपंच शंकर जवळ,मंडळाचे अध्यक्ष सदाशिव जवळ,आण्णासाहेब धनावडे, माजी सरपंच गणपत जवळ,सुरेशबुवा जवळ,श्री राजेंद्र जवळ, श्रीम गीता लोखंडे,कल्पना जवळ,शांताबाई जवळ,कार्यकारी समिती बबन जवळ,ज्ञानदेव जवळ,आनंदराव जवळ,शंकर जवळ,पांडुरंग जवळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सरपंच सुरेखा मर्ढेकर पुढे म्हणाल्या महिलांच्या आरोग्या बरोबच , आर्थिक व सामाजीक स्तर उंचावण्यासाठी आपण विशेष उपक्रम राबविणार असल्याचे सांगून महिलांनाा महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्याा.शिबिरामध्ये 110 महिलांची आरोग्य तपासणी व 24 पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली .शिबिरामध्ये 30 हजार रुपयांची औषधे वाटप करण्यात आली. 80 लाभार्थींच्या रक्ताचे नमुने सातारा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणे आले. सदर कार्यक्रमात गावातील 12 महिला बचत गटाचे अध्यक्ष यांचा सन्मानपत्र ,श्रीफळ,बुके देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच गावातील अपंग लाभार्थिंना ग्रामपंचयतीतर्फे 21467/. रुपये अनुदान वाटप करण्यात आले .आंगणवाडी सेविका व मदतनीस यांचाही कोविड योद्धा म्हणून सत्कार करणेत आला.आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय मेढा, प्राथमिक आरोग्य केंद्र केळघर यांचे विशेष सहकार्य लाभले.सतिश मर्ढेकर यांनी कार्यकमाचे सुत्रसंचलन ,उपस्थीतांचे स्वागत व आभार मानले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!