स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – एस पवार (कुडाळ)
कुडाळ.दि.०७ जावळी तालुक्यातील सोनगाव विकास सेवा सोसायटीची निवडणूक पार पडली.त्यामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले याचे समर्थक जयदीप शिंदे यांच्या अजिंक्य सहकार पॅनेलने १३ विरुद्ध ० असा निर्विवाद विजय मिळवला आहे. यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहायक मयूर देशमुख यांच्या पिंपळेश्वर वाकडेश्वर पुरस्कृत परिवर्तन पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जयदीप शिंदे यांच्या गटाविरुद्ध मयूर देशमुख गटाने पिंपळेश्वर वाकडेश्वर परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती.या निवडणुकीमध्ये अजिंक्य सहकार पॅनेलने वर्चस्व सिद्ध केले आहे.
सोसायटीच्या निवडणूकित जगन्नाथ चिकणे,रामदास दुदुस्कर,विजय दुदुस्कर,अमित शिंदे, जयदीप शिंदे,नारायण शिंदे, रामदास शिंदे,सुरेश शिंदे,कुसूम चिकणे,लीलावती चिकणे,दत्तात्रय पालकर, अशोक रोकडे,कविता जाधव या अजिंक्य सहकार पॅनेलनच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.मतमोजणीनंतर जयदीप शिंदे यांच्या कार्यकर्त्यानी गुलालाची उधळण करीत गावातून विजयी मिरवणूक काढली.यामध्ये जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे,माजी उपसभापती हणमंतराव पार्टे,समीर आतार, सागर धनावडे याच्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.



