महाराष्ट्रराजकीयसातारा

गांजे पंचक्रोशीच्या विकासासाठी कटिबद्ध… विजय सुतार..

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – सुर्यकांत पवार (सर)

कास. दि.०९  जावली तालुक्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून गांजे गावातील व आजूबाजूच्या वाडीवस्तीतील अनेक विकासकामे मार्गी लावली असून गांजे पंचक्रोशीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य विजय सुतार यांनी गांजे येथे केले.    ग्रामपंचायत गांजे व सरपंच लक्ष्मी चिकणे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग दलीत वस्ती सुधार योजनेतून सम्राटनगर येथील रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

आ. शिवेद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली जि.प.सदस्या सौ.अर्चनाताई रांजणे यांच्या प्रयत्नातून सम्राट नगर येथे सात लाख रुपये खडीकरण व डांबरीकरण रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. माध्यमिक विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. गावच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू असे सरपंच सौ. लक्ष्मी चिकणे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

कार्यक्रमास चंद्रकांत चिकणे, उपसरपंच सौ. द्रौपदाबाई चिकणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सुर्वे, दिनकर गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास शिंदे, गांजे विकास सेवा सोसायटी संचालक संपत सोनवणे, सांगवीचे ग्रामस्थ जगन्नाथ पवार, सम्राट नगर मधील दादू सोनावणे, विकास परिहार, लक्ष्मण सोनावणे, संपत सोनावणे, दिपक सोनावणे, मधूकर परिहार, ज्ञानदेव सोनावणे, राधाबाई सपकाळ, कमल सोनावणे, विमल सोनावणे, करूणा सोनावणे, शैला सोनावणे, शांताबाई परिहार, पुष्पा तांबे तसेच गांजे ग्रामस्थ तानाजी कदम, भैरू (बुवा) चिकणे , आनंदा चिकणे, सुभाष धनावडे, किसन देशमुख, विष्णू चिकणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!