
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
मेढा.दि.१० जावली तालुक्यातील करहर येथे भाजप तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप पक्षाचा विजयाचा आनंद करहर येथिल आठवडा बाजारात बाजारपेठेमध्ये पेढे वाटून साजरा केला.
भाजपाने उत्तर प्रदेश,गोवा,उत्तराखंड या विधानसभा निवडणूकांमध्ये बहुमत मिळवले आहे.जावली तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, उपाध्यक्ष किरण भिलारे, सरचिटणीस प्रदीप बेलोशे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मेघराज बेलोशे, किसान मोर्चाचे सुनिल पोफळे, सहकार आघाडीचे तालुकाध्यक्ष अविनाश पवार,दिव्यांग आघाडीचे तालुका सरचिटणीस विवरचे माजी सरपंच विठ्ठल धनावडे गुरव साहेब आदी भाजपा जावलीचे पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.



