महाराष्ट्रराजकीयसातारा

माण तालुक्यातील पाचवड विकास सेवा सोसायटी मध्ये वंचित बहुजन आघाडीचे रामचंद्र भोसले विजयी

स्टार 11 महाराष्ट्र न्युज नेटवर्क प्रतिनिधी-अतुल खरात

माण. दि.११  माण तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी पाचवड विकास सेवा सोसायटी मध्ये उमेदवार निवडून आणून माण-खटाव मतदारसंघांमध्ये सहकार क्षेत्रात खाते खोलले आहे.


पाचवड विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत क्रमांक 3 ची मते मिळवून रामचंद्र भोसले हे विजयी झाले आहेत त्यांना तालुकाध्यक्ष युवराज भोसले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर जिल्हा संघटक इम्तियाज नदाफ ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत खरात दहिवडी शहराध्यक्ष पोपटराव खरात तालुका संघटक राजेंद्र आवटे महादेव राठोड संजय शिंदे इत्यादींच्या विशेष सहकार्य व मार्गदर्शनाने हा विजय खेचून आणण्यात आला मिळालेल्या विजयाबद्दल पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकेर भाई तांबोळी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, जिल्हाध्यक्ष बाळकृष्‍ण देसाई, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, तसेच जिल्हा प्रभारी व राज्याचे उपाध्यक्ष मा. प्राध्यापक सोमनाथ साळुंखे, नगरसेवक तुषार बैले,नगरसेवक शोभाताई बडेकर यांनी रामचंद्र भोसले यांचे विशेष अभिनंदन केले.

तसेच माण तालुका वंचितच्या वतीने दहिवडी समाज मंदिर येथे रामचंद्र भोसले यांचा सत्कार घेण्यात आला त्यावेळी जिल्हा संघटक इम्तियाज नदाफ , वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा सदस्य चंद्रकांत खरात, माण तालुका अध्यक्ष युवराज भोसले, दहिवडी शहर अध्यक्ष पोपट खरात, मिलिंद भोसले, बाळासाहेब भोसले, संतोष भोसले, अर्जुन भोसले, महेंद्र वामन भोसले, पांडुरंग चव्हाण, दीपक खरात, उत्तम भोसले, महेंद्र भोसले, युवक आघाडीचे निखिल कुंभार, धीरज खरात, प्रथमेश मोरे, अमेय कांबळे, केतन खरात, अर्जुन धाइंजे इत्यादी उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!