क्रीडामहाराष्ट्रसातारा

तळदेव ता महाबळेश्वर येथील क्रिकेटच्या मैदानाचे उदघाटन ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत मोरे (गुरुजी) यांच्या हस्ते

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – संदिप गाडवे

केळघर.दि१३ तळदेव (ता:महाबळेश्वर) येथे शिवसेना शाखाप्रमुख अंकुश जंगम यांनी क्रिकेटसाठी सुसज्य मैदान व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
आज तळदेव ता महाबळेश्वर येथील क्रिकेट च्या मैदानाचे उदघाटन शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत मोरे (गुरुजी) यांच्या हस्ते करण्यात आले.
या कामासाठी अर्थ सहाय्य महाबळेश्वर तालुका शिवसेना संघटक गणेश उतेकर,शिवसेना तालुका प्रमुख संजय शेलार युवा सेनेचे तालुका प्रमुख विशाल सकपाळ ,तापोळ्याचे सरपंच आनंद धनावडे वेळापूर चे सरपंचराम सकपाळ ,अजित सकपाळ ,गणपत कदम ,जेष्ठ शिवसैनिक हरिश्चंद्र जंगम,अंकुश जंगम ,किशोर जंगम,नारायण जंगम किरण जंगम ,राजू सकपाळ, दिनेश जंगम, विकास जाधव, विनायक जंगम व शिवसैनिक उपस्थित होते. या मैदानामुळे ग्रामीण भागातील युवकांच्या प्रतिभेला निश्चित न्याय मिळून दुर्गम व ग्रामीण विभागात चांगले क्रिकेटपटू तयार होतील ,असा विश्वास शिवसेना संघटक गणेश उतेकर यांनी व्यक्त केला. अंकुश जंगम यांनी स्वागत करून आभार मानले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!