महाराष्ट्रसातारासामाजिक

कोयनेच्या खोऱ्यातील मालदेवच्या वाघाच्या आयुष्यातील अंधाराला वयाच्या नव्वदीत मिळाला पूर्णविराम…

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – सुर्यकांत पवार (सर)

कास.दी.१६. कराडमधील नामवंत नेत्रतज्ञ डॉ. फासे यांच्या दातृत्वातून आधुनिक जमान्यातील जंगलमॅन म्हणून ओळख असलेल्या मालदेवच्या शामराव कोकरे यांच्या आयुष्यातील अंधार दूर झाला आहे.
सुरुवातीला कोयना धरण नंतर कोयना अभयारण्य आणि त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असे एक नाही तर तीन तीन प्रकल्प उरावर घेऊन ही आपल्या मूळ मातीशी घट्ट नाळ रुजलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अर्थातच कोयनेच्या खोऱ्यातील ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे शामराव झिमाजी कोकरे वय वर्षे ८५ आणि कोणत्याही परिस्थितीत या वाघाची साथ न सोडणारी त्यांची वाघीण पत्नी धोंडाबाई शामराव कोकरे वय वर्षे ८१ यांचा वयाच्या नव्वदीतही जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष पाहून काल कराड मधील नामवंत नेत्रतज्ञ डॉ. राहूल फासे यांनी कोकरेंच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी त्यांच्या कोळंबाच्या झोपडीत सोलर होम स्ट्रीट लाईट च्या रूपाने प्रकाश निर्माण करून दिला. सोबत जीवनावश्यक साहित्यापैकी चटई, ब्लँकेट, चप्पल आणि सहा महिने पुरेल असे किराणा कीट कोकरेंना भेट दिले.
आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या कोळंबाच्या झोपडीत प्रकाश आल्यामुळे कोयनेचा हा जंगलमॅन भारावून गेला होता. ज्यांचं आख्ख आयुष्य अंधारात गेलं त्यांच्यासाठी सोलर लाईट ही नक्कीच मोठी किंबहुना विशेष गिफ्ट होती.
डॉ. फासे ही नेहमीच दुर्गम आणि डोंगराळ भागातील निराधार लोकांसाठी तसेच अशा ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या गरीब-गरजू विद्यार्थ्यांसाठी कायम मदतीचा हात पुढे करत असतात. डॉ. फासे यांच्या या अनोख्या उपक्रमाचे संपूर्ण कोयना विभागातून कौतुक होत आहे. फोटो – बामणोली – जंगलमॅन शामराव कोकरे यांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी मिळालेल्या सोलर साहित्यासह कोकरे..

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!