
स्टार ११ महाराष्ट्र
सातारा प्रतिनिधी
सातारा शहरात रमजान ईद उत्साहात साजरी होत असताना नेहमीच मानवतेचा संदेश देणारी खिदमत ए खलक संस्थेने पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवून दिलेलं आहे . कोव्हिड साथीच्या काळात सर्व नाती संपत चालली होती त्यावेळेस माणुसकीसाठी सदैव तत्पर हया ब्रीदवाक्याला समोर ठेवून समाजातील सर्व घटकांसाठी जात पात विसरून कार्य केले आणि त्यासाठी त्यांचा असंख्य संघटनांनी सत्कार आणि कौतुक केले .
रमजान ईद निमित्त खिदमत ए खलक च्या वतीने मशिदींबाहेर ईद हा सण शांततेत पार पडावा यासाठी कडेकोट बंदोबस्त देत असलेल्या पोलीस बांधवांना स्वतःच्या ईदचा उत्सव बाजूला ठेवत पाणी, शीरखुर्मा आणि शाकाहारी बिर्याणीचे देखील वाटप करण्यात आले . पोलीस बांधवांना केलेल्या या सहकार्याबद्दल पोलीस बांधवांनी देखील खिदमत ए खलक आणि मुस्लिम बांधवांचे आभार मानले.
ह्यावेळेस खिदमत ए खल्कच्या सादिकभाई शेख , साजिदभाई शेख, मुबिन महाडवाले यांच्या मार्गदर्शनुसार अब्दुल सुतार , हाजी सलिम भारत , हाजी अमजद भारत,असिफ खान, आरिफ खान, असिफ फरास, शाहरुख शेख,आबिद बागवान ,राजू मुस्तफा,सलिम पाळणेवाले, हाफीज मुराद, शमशुद्दीन भाई आफताब भाई , अय्याजभाई यांनी प्रयत्न केले छोटे समाजसेवक फैज मोहम्मद , अयान , फरान खान सुद्धा समाजसेवेचा धडा घेत सक्रिय होते.



