
स्टार ११ महाराष्ट्र
भोसे, ता. ३१ ः काटवली (तालुका जावळी ) येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी समर्थ प्रकट दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला. काटवली येथील जननी माता मंदिरात हा कार्यक्रम पार पडला.

सभागृहात सकाळी स्वामी समर्थांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी होमहवन,अभिषेक, आरती तसेच दुपारपर्यंत स्वामी चरित्र ग्रंथ पारायण करण्यात आले.समाजातील दानशूर व्यक्तीकडून मिळालेल्या देणगीवर अन्नदान तसेच महाप्रसाद झाला.

काटवली तसेच बेलोशी, दापवडी , शिंदेवाडी, रुईघर तसेच परिसरातील भक्तगण यांनी पंधरा दिवस मंदिरात पारायण केले त्याची सांगता आज विविध उपक्रमांनी प्रकटन दिनदिवशी विविध उपक्रमांनी करण्यात आली. स्वामी समर्थ महाराजांचे भक्तगण मोठ्या श्रद्धेने स्वामींच्या पादुकांचे पूजन करत “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हे स्वामींचे वचन मनोभावे आठवत होते. स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना संकटाच्या काळात नेहमीच आधार दिला आहे. त्यांच्या कृपेने भक्तांच्या आयुष्यातील दुःख, संकटे दूर होतात, असा भक्तांचा विश्वास आहे.

मंदिरात प्रकट दिनानिमिच्च विविध कार्यक्रम झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सर्व सदस्य तसेच गावातील महिला ग्रामस्थ, युवक मंडळ व महिलांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण गावात भक्तिरसाने ओथंबून वातावरण भक्तिमय झाले होते. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने गावकऱ्यांना एक अपूर्व आध्यात्मिक आनंद अनुभवायला मिळाला.