महाराष्ट्रसातारासामाजिक

विद्यार्थी घडवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने सजग व्हावे… रामचंद्र चिकणे.

स्टार ११महाराष्ट्र / सुर्यकांत पवार (सर)

कास ता. १७. प्राथमिक शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात आघाडीवर असून या शाळांमधील विद्यार्थी घडवण्यासाठी शाळेची व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या शाळा व्यवस्थापन समित्यानी सजग व्हावे असे आवाहन गांजे प्राथमिक शाळेतील शिक्षण समिती तज्ञ सदस्य रामचंद्र चिकणे यांनी केले.

गांजे केंद्रातील सर्व शाळांच्या सदस्यांचे प्रशिक्षण नुकतेच केंद्रप्रमुख विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. उपस्थित पदाधिकारी व समिती सदस्य यांचे कार्य,शालेय स्तरावर काम करत असताना समितीची रचना, जबाबदारी, कोणत्या बाबींवर दक्षता घ्यायची याचे सविस्तर मार्गदर्शन संजयकुमार झाडे सर व सुनिल जांभळे सर यांनी केले.गांजे शालेय समितीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी आपण जय जिजाऊ व जय छत्रपती शिवाजी महाराज म्हणत असताना त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
गांजे शालेय कमिठीचे शिक्षणतज्ञ रामचंद्र चिकणे (आण्णा) यांनी आपले मत मांडताना मोठे शासकीय अधिकारी
तहसिलदार, कलेक्टर, PSI व BDO या पदापर्यत पोचण्यासाठी मुलांना प्रथमिक शिक्षण देत असताना पालकांना व मुलांना जागृत करायला हवे असे सांगून शिक्षकांनी पालक मिठींग लावून चर्चा घडवून आणली पाहिजे. शालेय कमिठीच्या मिठींगमध्ये त्याचा आढावा घेतला पाहिजे असे प्रखर मत मांडले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी गांजे शाळेचे मुख्याध्यापक शंकरराव देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले.
शिबीराला नामदेव चिकणे, प्रशांत गायकवाड सर, सुर्यकांत पवार सर, लक्ष्मन जूनघरे गुरूजी, सुनिल धनावडे सर, बोराटे सर, हणमंत लोहार सर, श्रद्धा भिलावे, रुपाली महाडीक, भोसले मॅडम, सुप्रिया गोळे मॅडम, खाडे मॅडम, रत्नाकर भिलारे व इतर शिक्षक समिती सदस्य उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!