महाराष्ट्रशैक्षणिकसातारा
श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनि.कॉलेज मेढा यांच्या वतीने विकासजी देशपांडे यांचा सत्कार
स्टार ११ महाराष्ट्र / युवराज धुमाळ
मेढा. दि.१७ जावली तालुक्यातील मेढा येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर,संचलित श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनि.कॉलेज मेढा.ता-जावली,यांच्या वतीने श्री विकासजी दामोदर देशपांडे यांची मेढा नगरपंचायत आरोग्य,स्वच्छता व वैद्यकिय विषयक,शिक्षण समितीच्या सभापती पदाची निवड झाले बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार करताना प्राचार्या सौ.निलम पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री सचिन करंजेकर,प्रा.पी.बी.पाटील सर,पर्यवेक्षक श्री चंद्रकांत शिंदे सर आणि सर्व सन्माननीय शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.श्री विकासजी देशपांडे हे श्री वेण्णा विद्या मंदीर व ज्युनिअर कॉलेजचे स्थानिक सल्लागार कमिटीचे अध्यक्ष आहेत.



