
स्टार ११ महाराष्ट्र
सातारा दि.२८. मेढा,महाबळेश्वर,म्हसवड,पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा, वाई, मलकारपूर व कराड, या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान मंगळवार दि. 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून या अनुषंगाने दि. 1 डिसेंबर 2025 रोजीच्या रात्री 10 वाजता प्रचार बंद होईल, असा सुधारित आदेश राज्य निवडणूक आयोग यांच्यातर्फे देण्यात आला आहे.
1 डिसेंबर 2025 रोजीच्या रात्री 10 नंतर सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिद्ध/प्रसारण देखील बंद होईल, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी कळविले आहे.
नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने 2 डिसेंबर रोजी सुट्टी
कराड,महाबळेश्वर, म्हसवड,पाचगणी,फलटण,रहिमतपूर, सातारा,वाई, मलकारपूर व मेढा या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान मंगळवार दि. 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये , निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका मंडळे, महामंडळे इत्यादींना लागू राहील. तसेच उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील.



