जिल्हाधिकारी सातारासातारा

अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

स्टार ११ महाराष्ट्र


सातारा,दि.१.   १५ नोव्हेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सातारा जिल्ह्यामध्ये अग्निवीर सैन्यभरतीची प्रक्रिया, सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  संतोष पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली, कर्न, प्रशांत सिंग, डायरेक्टर आर्मी रीक्रूटिंग ऑफिसर, कोल्हापूर,उप विभागीय अधिकारी आशिष बारकुल व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी   सतेश हंगे  यांच्या अथक प्रयत्नाने अग्निवीर सैन्य भरती अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या पार पडली.


या भरती प्रक्रियामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील व उत्तर गोवा येथील ९ हजार   युवकांचा सहभाग होता. भरती प्रक्रियासाठी मैदानी चाचणी व मेडिकलसाठी कॉल लेटर द्वारा बोलविण्यात आले होते. त्यामधील ४ हजार  अग्निवीर सैनिक शारिरीक  व मेडिकलमध्ये उतीर्ण झाले आहेत. यानंतर अंतिम निवड प्रक्रिया आर्मी रीक्रूटिंग ऑफिस, कोल्हापूर यांचेकडून मेरिटप्रमाणे कॉल लेटरद्वारे संबंधित अग्निवीरास कळविण्यात येईल  अशी माहिती  कर्नल डायरेक्टर आर्मी रीक्रूटिंग ऑफिसर, कोल्हापूर प्रशांत सिंग यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!