महाराष्ट्रराजकीयसातारा

जावली तालुक्यातील १० विकासकामांसाठी १ कोटी निधी आ.शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


केळघर.दि.२४ सातारा- जावली तालुक्यातील ९ गावातील बौद्ध वस्तीतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून १ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत १० विकासकामे मंजूर झाली आहेत.

जावली तालुक्यातील ९ गावातील दलित वस्तीतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे निधीची मागणी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरून ना.धनंजय मुंडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत १० कामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

म्हसवे येथे बौद्ध वस्ती ते ओढा काँक्रीट गटर करणे, आर्डे येथील पंचशीलनगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे, बेलावडे येथील अशोकनगर स्मशानभूमी रस्ता व सुशोभीकरण करणे, भिवडी येथील सम्राट अशोकनगर येथे आरसीसी गटर करणे, इंदवली येथील सम्राट अशोकनगर येथे आरसीसी गटर करणे, रानगेघर येथील मागासवर्गीय वस्तीतील रस्ता करणे, सनपाने वरचीवाडी पंचशीलनगर रस्ता काँक्रीटीकरण करणे, खर्शी बारामुरे येथील अण्णाभाऊसाठे नगर येथे रस्ता करणे व समता नगर येथे रस्ता करणे तसेच कावडी येथील वसंतनगर अंतर्गत रस्ता करणे या कामांसाठी प्रत्येकी १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
तातडीने या सर्व कामांच्या निविदा सादर करून प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून कामे वेळेत पूर्ण करा आणि कामे दर्जेदार करा, अशा सूचनाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!