विशाल गुरव यांच्या पोलीस पाटील होण्याचा वंचित समाजाला अभिमान वाटतो… इम्तियाज नदाफ
स्टार ११ महाराष्ट्र / प्रतिनिधी-अतुल खरात
दहिवडी दि.२५.नुकत्याच झालेल्या पोलीस पाटील निवडीमध्ये आंधळी गावांमधून आरक्षित असलेल्या ओबीसी समाजाच्या उमेदवारास संधी मिळणार होती या संधीचे सोने करत अनेक उमेदवारांनी अर्ज भरले मात्र विशाल गुरव यांनी स्वतःची पात्रता सिद्ध करत पोलीस पाटील पदावर नियुक्ती मिळवली.
विशाल गुरव हा पोलीस पाटील म्हणून गावाला हुशार होतकरू व समाजाभिमुख चेहरा बहुजन समाजातून मिळाला. सामाजिक विषमतेने ग्रासलेल्या भारतीय समाजातून राजर्षी शाहूंच्या संकल्पनेतून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून साकारलेल्या आरक्षण पद्धतीमुळे पिढीजात वंचित समाजाला सुद्धा सन्मानाच्या पदांवर नियुक्त होतायेत याची प्रचिती आंधळी गावच्या पोलीस पाटील पदाच्या नियुक्तीवरून सिद्ध होते. त्यामुळे विशाल गुरव-पाटील यांच्या पोलीस पाटील होण्याचा वंचित समाजाला मोठा अभिमान वाटतो असे मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक इम्तियाज नदाफ यांनी व्यक्त केले.
समाजातील अनेक स्तरातून विशाल गुरव पाटील यांचे अभिनंदन होत असून वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा संघटक इम्तियाज नदाफ यांनी वंचितांचे नेते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांतजी खंडाईत यांच्या हस्ते दहिवडी येथे आंबेडकर भवन मध्ये विशाल गुरव यांचा सत्कार आयोजित केला होता त्याच वेळी बोलताना चंद्रकांत खंडाईत जी यांनी विशाल गुरव-पाटील यांचे अभिनंदन व सत्कार केला.
यावेळी वंचित चे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, जिल्हा सचिव दादासाहेब केंगार, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कारंडे, जिल्हा सल्लागार चंद्रकांतजी खरात, माण तालुका अध्यक्ष युवराज भोसले, वडूज चे वंचित चे नेते अशोक जी बैले, संतोष घाडगे, संतोष पारसे, दहिवडी शहराध्यक्ष पोपट खरात, तालुका संघटक राजेंद्र आवटे, बंटी खरात, दिपक खरात, आंधळी चे वसंत खरात, सौरभ अहिवळे, प्रवीण माने, पत्रकार अतुल खरात इत्यादी उपस्थित होते.



