राजकीय

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रांजणेंचा दणदणीत विजय; गोळेंना ८ मतांवर समाधान

स्टार ११ महाराष्ट्र

केळघर.  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून,ज्ञानदेव रांजणे यांनी विजय मिळवला.या निवडणुकीत एकूण ४८ पैकी ४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतमोजणीनंतर ज्ञानदेव रांजणे यांना ३८ मते मिळाली, तर विठ्ठल गोळे यांना ८ मते मिळाली. अशा प्रकारे रांजणे यांनी ३० मतांच्या फरकाने विजय संपादन केला.

शशिकांत शिंदे यांच्या माघारीनंतर या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रांजणे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. या निकालामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!