आंतरराष्ट्रीय पॅरा इथलॅटिक स्पर्धा विजेता प्रणव देसाई यांचा शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेच्या वतीने केला सत्कार…
मुंबई.दि.०३.शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेच्या वतीने आज ठाणे येथे अध्यक्ष श्री.संदीप तानाजी भोज यांच्या सूचनेनुसार व सरचिटणीस श्री.जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ठाणे येथे कु.प्रणव प्रशांत देसाई याने दुबई येथील आंतरराष्ट्रीय पॅरा इथलॅटिक स्पर्धेत 100 व 200 मीटर रनिंग मध्ये त्याने सुवर्णपदक मिळविल्याबद्दल प्रणव देसाई, यांचे वडील प्रशांत देसाई,आई व आजी यांचा आज शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेच्या वतीने ठाणे येथे त्यांच्या राहत्या घरी सत्कार करण्यात आला.
प्रणव हा अपंग अथलेटिक्स राज्य स्पर्धा खेळत पुढे जाणारा खेळाडू याच्या उजव्या पायामधे रानिंग ब्लेड टाकून शस्त्रक्रिया झालेली आहे तरीही देशासाठी पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्याची महत्वाकांक्षा असलेला आज रोजी दुबई येथील आंतरराष्ट्रीय पॅरा इथलॅटिक स्पर्धेत 100 व 200 मीटर रनिंग मध्ये त्याने सुवर्णपदक मिळवले आहे सध्या प्रणव काठमांडू येथे स्पर्धेची तयारी करतो आहे. अशा खेळाडू चे आई वडील यांचा प्रणव च्या यशात सिंहाचा वाटा आहे.
त्याप्रसंगी शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य संघटनेच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ.अमृता पवार,मुंबई महिला सरचिटणीस सौ.ज्योतीताई भोसले,शिवसेना रत्नागिरी संपर्कप्रमुख व घणसोली उपशहर प्रमुख श्री.मंगेश साळवी,उपजिल्हा संघटीका ओवळा माजिवाडा सौ.संपदा पांचाळ,ईशान्य मुंबई अध्यक्ष श्री.हितेश गायकवाड, सायन कोळवाडा विधानसभा अध्यक्षा ज्योती ठोंबरे दांडेकर,ठाणे तालुका उपध्यक्ष सौ.मनिषा लोंढे, ओवळा माजिवाडा विधा.अध्यक्षा सौ.वैभवी चव्हाण,विधा.उपाध्यक्षा सौ.सुनीता चुडामासा, ओवळा माजिवाडा विधा.सचिव श्री.सचिन जोईजोडे,शहर अध्यक्षा सौ.अंकिता पांचाळ,कोपरी पांचपाखाडी विधा. अध्यक्षा सौ.हेमांगी राबिवडेकर,विधा. उपाध्यक्षा सौ.रंजना पाटील,विभाग अध्यक्षा सौ.मंदा मिस्त्री,हरी निवास विभाग अध्यक्षा सौ.भारती पवार,श्री.संदीप वारीसे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



